रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 2 व 3 फेब्रुवारीला प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरोग्य तपासणी

 रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 2 व 3 फेब्रुवारीला प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरोग्य तपासणी

अमरावती, दि. 31 (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ऑटो रिक्षा व स्कूल बस वाहन चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. 2 व 3 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता होणार आहे. या शिबीराचा वाहनचालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे.

शिबीरामध्ये ऑटो रिक्षा व स्कूल बस वाहन चालकांचे रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी व हृद्य स्पंदन इतर बाबींची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहे.  तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्य तपासणीनंतर वाहन चालकात गंभीर दोष आढळल्यास त्यांना शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात येईल.

दिवसेंदिवस रस्ते अपघात ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो व्यक्ती रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहे. तर कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते अशा व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकरीता प्रादेशिक परिवहन विभागामार्फत जनजागृतीकरीता विविध उपक्रम राबविण्यात येते.  'सडक सुरक्षा-जीवन रक्षा ' हे या वर्षाचे रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य असून त्याप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा परिवहन विभागाच्या महत्त्वाच्या जबाबदारीपैकी एक आहे. या करिता परिवहन विभागामार्फत रस्ते सुरक्षा संदर्भात वाहन चालकांना वाहन चालविण्याच्या कौशल्याचे प्रशिक्षण, आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले जातात.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती