Tuesday, January 30, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन


 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

              अमरावती, दि. 30 (जिमाका): सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह गजानन महाराज मंदिरासमोर पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतकाचे अंदाजे वय 35 वर्षे असून मृतकाचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे केस काळे, दाडी मीशी वाढलेली, अंगात हाफ बाहीची पांढरे रंगाची फिक्कट गुलाबी रंगाची पटेृ असलेली टी शर्ट, ग्रे रंगाचा लोअर कथीया रंगाची अंडर विअर  पांढरे रंगाचे फुल असलेली, उजव्या हातावर रवि नाव गोंदलेले, तसेच उजवे हाताचे पंजाचे मागे आई नाव गोंदलेले आहे.

           मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001  किंवा  वपोनी विजय वाकसे  भ्रमणध्वनी क्रं. 9923252696 किंवा पोहेकॉ एम जुनेद  9823178186 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलिस अमरावती (शहर) यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...