Posts

Showing posts from June, 2017
Image
चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शनिवारी प्रारंभ वृक्षदिंडीत मोठा प्रतिसाद; नागरिकांनी केला वृक्षसंवर्धनाचा निर्धार               अमरावती, दि. 30 :    शासनाच्या 4 कोटी वृक्षलागवड अभियानाला उद्यापासून (दि. 1 जुलै) प्रारंभ होत असून, त्यानिमित्त आज वनविभागातर्फे शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला.    जिल्हाधिकारी कार्यालयापासून या वृक्षदिंडीची सुरुवात झाली. प्रारंभी महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे,  विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे,  जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतर दापोरी येथील संत तुकडोजी महाराज भजन मंडळीच्या कार्यकर्त्यांनी गायिलेल्या भजनाच्या तालासुरावर दिंडी इर्विन चौकाकडे मार्गस्थ झाली.           पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचाही सहभाग इर्विन चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील हेही दिंडीत सहभागी झाले. पालकमंत्र्यांनी दिंडी खांद्यावर घेत नागरिकांचा व प्रशासनाचा उत्साह वाढवला. ‘चला
Image
वनविभागातर्फे जिल्ह्यात लावणार साडेआठ लाख झाडे              वृक्षारोपण अभियान सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद                             अमरावती दि.28:  ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी आज वृक्षारोपणाचा संदेश दिला. निमित्त होते वृक्षलागवड अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे आयोजिलेल्या सायकल फेरीचे! वन विभागातर्फे दि. 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्षलागवड होणार आहे. अमरावती  जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.  या अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.             विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. मुख्य वनसंरक्षक यां
Image
 उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती राज्यात अव्वल ठरेल -  पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील पालकमंत्र्यांकडून विकास कामांची पाहणी    अमरावती दि.26: जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्या अद्ययावत सुविधा असलेल्या प्रशस्त इमारती शहरात आकारास आल्या आहेत. शहरातील उड्डाण पूल, रस्ते आदी विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. या उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती शहर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.     शहरात उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आदी इमारती, राजापेठ उड्डाण पूल, बेलोरा विमानतळ आदी विविध विकास कामे व प्रकल्पांची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले