Posts

Showing posts from June, 2021

बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
                                          'उडान' उपक्रमात कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. 28 :    'उडान' उपक्रम बंदीजनांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा असून,    त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला.           अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ    देशमुख,    महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,    सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,    जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते.           कारागृहात बंदीजनांतील कारागीर, कलावंताच्या

बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
                                                          शेतकरी व महिला  गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. २८ : दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे    प्रतिपादन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.           कृषी विभाग, आत्मा व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली, त्याचे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, वि. प. स. किरण सरनाईक, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, कृषी    सहसंचालक शंकर तोटेवार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.           पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मा.

महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
                                                                                            महिला व बालविकास भवनाचे भूमिपूजन महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. 28 : महिला व बालविकास योजना राबविणारी सगळी कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी महत्वाची सुविधा निर्माण होणार असून, योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.           येथील गर्ल्स हायस्कुल परिसरात महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ   देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,   जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते

'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  'सायन्सकोर'वर तारांगण 'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. 28   : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती भव्य सायन्सकोर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केले.           सायन्सकोर मैदानावर सायंटिफिक पार्कचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले. मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक व इतर सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.           माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ   देशमुख, माजी राज्यमंत्री सुन

निवडणूक यंत्रणेचा उपक्रम 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
  निवडणूक यंत्रणेचा उपक्रम 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ             अमरावती, दि. 28 : निवडणुकीतील महत्वपूर्ण साधने असलेल्या 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट" यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.   माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ     देशमुख,     महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,     सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,     जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.             सामान्य प्रशासन विभागाकडून या कामासाठी 14 कोटी 99 लक्ष रुपये निधीच्या नियोजनाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे काम होत आहे. अशी असेल रचना             

आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. 28 : मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा. त्यासाठी 'मेळघाट हाट'ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, असे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.             पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी 'मेळघाट हाट' प्रकल्प आकारास येत आहे. त्याअनुषंगाने नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी आदी उपस्थित होते. 'माविम'चे ज

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण       - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर     बेनोडा (शहीद) आरोग्य केंद्र व मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन   वणी ममदापूर येथील ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण                 अमरावती, दि. २७: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन   प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीने राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गोर-गरीब रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाईल. याअंतर्गत ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य दिल्या जाईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बेनोडा येथे सांगितले.               वरुड तालुक्यातील