आशासेविका व आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ व्हावी - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन



आशासेविका व आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ व्हावी

-          महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

अमरावती, दि. 10 :  कोरोना साथ नियंत्रणासाठी आघाडीवर राहून कार्यरत असणा-या आशासेविका व आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ता म्हणून आशासेविका व आशा गटप्रवर्तक या कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिवसरात्र झोकून काम करत आहेत. साथ नियंत्रणासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आशाताई व आशा गटप्रवर्तक यांचा सहभाग विविध साथीच्या रोगांच्या सर्वेक्षणापासून गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यापर्यंत आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत मानसिक आजारांचे सर्वेक्षण करण्यापासून ते विविध लसीकरणास मदत करणे अशी विविध प्रकारची 70 ते 75 कामे करत आहेत.

त्यामुळे आशासेविका व आशा गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेऊन, त्याबाबतचा लाभ त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडून शासनस्तरावर पाठपुरावा होत आहे.

000   

 

 

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती