शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन ठाकरे कुटुंबाला सर्वतोपरी मदत
- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. २० : शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज पिंपळविहिर येथे केले. पिंपळविहीर येथील सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे हे नक्षलग्रस्त भागात कार्यरत होते. शहीद ठाकरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले. शहीद ठाकरे हे छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात कार्यरत होते. त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे राहू. या कुटुंबाला शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे कुटूंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती