Posts

Showing posts from November, 2020

आज मतदान, यंत्रणा सुसज्ज मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

Image
  आज मतदान, यंत्रणा सुसज्ज मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना अमरावती, दि. 30 :   शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उद्या (दि. 1) होणार असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी पथके आज रवाना झाली. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे. मतदानासाठी जिल्ह्यातील नियुक्त पथकांना निवडणूक साहित्याचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बॅडमिंटन हॉल येथून करण्यात आले.    सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते. निवडणूक साहित्य संच अमरावती जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आले. त्यांचे विकेंद्रीकृत पद्धतीने वितरण आज करण्यात आले. याचठिकाणी मतदान पथकाला मतदान प्रक्रियेविषयी पुन्हा माहिती देण्यात

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

Image
  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमेत्तिक रजा -           निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह   अमरावती, दि. 29 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी (एक डिसेंबर) शिक्षकांना विशेष नैमेत्तिक रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिका-यांना जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ही रजा कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.                                         मतमोजणी कक्षाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेशास प्रतिबंध                         मतमोजणी कक्ष व सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी अधिकारी, कर्मचारी व निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील ओळखपत्र असणा-या व्यक्तींव्यतिरिक्त दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी

विधानसभा मतदार संघाच्या यादीतील दुबार मतदारांची वगळणी

  विधानसभा मतदार संघाच्या यादीतील दुबार मतदारांची वगळणी छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याच्या सूचना छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी  www.amravati.gov.in  संकेतस्थळावर उपलब्ध मतदारांनी नमूना 8 अर्ज सादर करण्याचे आवाहन अमरावती, दि. 29 : विधानसभा मतदारसंघाच्या याद्यामधील दुबार मतदारांची वगळणी करणे व मतदार छायाचित्र ओळखपत्रासंबंधातील त्रुटी दूर करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेळापत्रक (Monthly Target Plan) तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी    संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले.    याअनुषंगाने नागरिकांना आपले नाव तसेच मतदार ओळखपत्रातील त्रुटी आदी जिल्हा प्रशासनाच्या  www.amravati.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपरोक्तप्रमाणे त्रुटींचे निराकरण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सर्वेक्षण करुन मतदारासोबत पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. स्थंलातरीत व मय्यत मतदारांच्याबाबत पुरावे उपलब्ध होत नसल्यामुळे दस्तऐवजाअभावी अशा मतदारांची

मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबी विहित वेळेत पूर्ण करा - निवडणूक निर्णय अधिका-यांचे निर्देश

Image
मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबी विहित वेळेत पूर्ण करा -      निवडणूक निर्णय अधिका-यांचे निर्देश अमरावती, दि. 28 :     मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबींची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले आहेत.मतदान केंद्रे निर्जंतुकीकरण करून घ्यावीत व तसा अहवाल सादर करावा. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राना दिलेल्या भेटी व इतर साहित्याबाबतचा अहवाल ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ पूर्वी सादर करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिले आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतपत्रिकेच्या स्थळप्रतीवर केलेली स्वाक्षरी मतदार नोंदणी नमुना १९ समवेत पडताळणी करणे आवश्यक असते. त्यानुसार मतदान केंद्राध्यक्षांना नमुना १९ उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले आहेत. प्रिंट मीडियामधील जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक              मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास म्हणजेच रविवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल.

मतदान व मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवा निवडणूक निर्णय अधिकारी पियूष सिंह यांचे निर्देश

Image
  मतदान व मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवा निवडणूक निर्णय अधिकारी पियूष सिंह यांचे निर्देश                  अमरावती, दि. 27 : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान व मतमोजणी केंद्रावर काटेकोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज दिले.                    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.                  श्री. सिंह म्हणाले की, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. विलासन

मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सुसज्ज - निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह

Image
  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2020 मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सुसज्ज -           निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह   · 963 अधिकारी-कर्मचा-यांचे मनुष्यबळ अमरावती, दि. 27 : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 963 अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ सुसज्ज ठेवण्यात आले आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे सांगितले.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे आदी उपस्थित होते.   शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 35 हजार 622 असून, त्यात 26 हजार 60 पुरूष आणि 9 हजार 562 महिलांचा समावेश आहे.   निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह म्हणाले की,   मतदानासाठी विभागात 77 मतदान पथकांबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन याप्रमाणे 15 राखीव पथके तय

निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह

Image
  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा - निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण                  अमरावती, दि. 26 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी आपापल्या जबाबदा-या समजून घेऊन नियोजनपूर्वक कामे करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.                     शिक्षक मतदार संघाच्या 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने येथील नियोजनभवन येथे मतमोजणीचे प्रात्यक्षिक स्वरुपात दीडशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, सहायक निवडणूक अधिकारी तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले व श्यामकांत मस्के यांनी यावेळी
Image
  निवडणूक तयारीला वेग, मतमोजणीचे आज प्रशिक्षण अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाहने नियुक्त विविध अधिकारी- कर्मचा-यांच्या पथकांच्या प्रशिक्षणासह आवश्यक सामग्री, वाहने अधिग्रहण, मतमोजणीस्थळी आवश्यक सुविधा आदी तयारीला वेग आला आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचारी यांचे उद्या (26) सकाळी अकराला नियोजनभवनात प्रशिक्षण होणार आहे. मद्यविक्रीला प्रतिबंध निवडणूक खुल्या, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करणारा आदेश सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तासांच्या अगोदरपासून, तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री व कोरडा दिवस जाहीर करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी श्री. नवाल यांनी आदेश पारित केले आहेत. त्यानुसार मतदानापूर्वीचा दिवस अर्थात 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजतापासून ते 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस पुढे, मतदानाचा दिवस 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अंध

प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रमानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करा - जिल्हाधिका-यांचे तहसीलदारांना आदेश

Image
                             ग्रामपंचायत   सार्वत्रिक निवडणूक    प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रमानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करा -            जिल्हाधिका-यांचे तहसीलदारांना आदेश   अमरावती, दि. 25 :   जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाला असून, त्यानुसार निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.   भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मतदार यादीतील सर्व मतदारांना मतदानाची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्ययावत मतदार यादीनुसारच कार्यक्रम आयोगाने निश्चित केला आहे. या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 1 डिसेंबर आहे. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 10 डिसेंबर आहे. प्रभागनिहाय मतदार