शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण


शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

       विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मतदान केंद्रांवर आरोग्य पथकही नियुक्त करण्यात येत आहे. त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, सुमारे ८० आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज झाले.
येथील नियोजनभवनात जिल्ह्यातील ८० आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण झाले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे आदी यावेळी उपस्थित होते.

        केंद्रात मास्क असल्याशिवायकुणालाही प्रवेश देऊ नये.           कोरोनाबाधित किंवा विलगीकरणात असलेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र, केंद्रावर आलेल्या एखाद्या मतदाराला ताप आदी लक्षणे आढळल्यास त्यांना टोकन देऊन दुपारी 4 वाजता मतदान केंद्रावर येण्याचे सूचित करावे, अशी सूचना प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली.

        मतदानाच्या दिवशी कुणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पीपीई कीट देण्यात यावी.  लक्षणे आढळलेल्या व बाधित असलेल्या मतदारांसाठी केंद्रावर स्वतंत्रपणे बसण्यासाठी विलगीकरण कक्षाची सुविधा असावी.

        मतदाराची ओळख पटावी यासाठी त्याला मास्क थोडावेळ हटवता येणार असून ही क्रिया जलद व अल्पावधीत घडावी.   संपूर्ण खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडावी. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आदी सुविधा ठेवाव्यात. कर्मचाऱ्यांनी सजग राहून प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

                                  ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती