विधानसभा मतदार संघाच्या यादीतील दुबार मतदारांची वगळणी

 विधानसभा मतदार संघाच्या यादीतील दुबार मतदारांची वगळणी

छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याच्या सूचना

छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी www.amravati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध

मतदारांनी नमूना 8 अर्ज सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 : विधानसभा मतदारसंघाच्या याद्यामधील दुबार मतदारांची वगळणी करणे व मतदार छायाचित्र ओळखपत्रासंबंधातील त्रुटी दूर करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेळापत्रक (Monthly Target Plan) तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले.  याअनुषंगाने नागरिकांना आपले नाव तसेच मतदार ओळखपत्रातील त्रुटी आदी जिल्हा प्रशासनाच्या www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उपरोक्तप्रमाणे त्रुटींचे निराकरण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सर्वेक्षण करुन मतदारासोबत पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे. स्थंलातरीत व मय्यत मतदारांच्याबाबत पुरावे उपलब्ध होत नसल्यामुळे दस्तऐवजाअभावी अशा मतदारांची वगळणी करता येत नाही. यामुळे मतदार यादीत अनावश्यक नोंदीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मय्यत किंवा स्थलांतरीत मतदारांची वगळणी करणे आवश्यक झाल्याने मतदारांनी यासंदर्भात दखल घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, छायाचित्र नसणे किंवा इतर त्रुटी असलेल्या मतदारांची यादी मतदारांच्या सोयीसाठी www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर यादीत नाव असलेल्या उमेदवारांनी संबंधित तालुक्याच्या बीएलओ किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रंगीत फोटोसह नमूना 8 अर्ज भरुन द्यावा. जे मतदार नमूना 8 भरुन अर्ज सादर करणार नाही, अशा मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती