Posts

Showing posts from November, 2018

जलयुक्त शिवार योजनेमुळे अमरावती जिल्ह्यात संरक्षित सिंचनाची सुविधा

Image

जिल्ह्यात मीझल्स रुबेला लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे -जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आवाहन

Image
जिल्ह्यात मीझल्स रुबेला लसीकरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे -जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आवाहन अमरावती, दि. 27 :   नवी पिढी सुदृढ व सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे.   येणा-या पिढीच्या भवितव्यासाठी पालक व समाजातील सर्व घटकांनी सहकार्य देऊन मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी आज येथे केले. गोवर आणि रुबेला या आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ येथील अरूणोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जि. प.   उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंतराव देशमुख, उपमहापौर संध्याताई टिकले, अरुणोदय संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंतराव लुंगे, डॉ. सोनाली शिरभाते, प्रशांत डवरे, रिताताई मोकमकार, नीलिमा काळे, महापालिका आयुक्त संजय निपाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठमके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आर
Image
" महावॉकेथॉन "   रॅलीने शहरात रस्ते सुरक्षा जागृती सार्वजनिक बांधकाम व परिवहनच्या 100 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग अमरावती, दि. 18 : परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आज शहरातून    " महावॉकेथॉन "    रॅलीद्वारे रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यात आली.   रस्ते नियम व दक्षता याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या " महावॉकेथॉन"    रॅलीमध्ये    सुमारे 100 हून अधिक अधिकारी-कर्मचारी व नागरिक    सहभागी होऊन २ किलोमीटर्सचे अंतर चालून ही महावॉकेथॉन रॅली यशस्वी केली.            सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या सहकार्याने निघालेल्या या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गीते    व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. नवघरे ,श्री. काझी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते   राज्यात एकाच दिवशी- एकाच वेळी महावॉकेथॉन रॅली काढण्यात आली
Image
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 चे लोकार्पण उर्वरित   वसतिगृहांच्या इमारतीही सर्व सुविधायुक्त उभारणार -            पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील *पावणेचार कोटींच्या निधीतून सुसज्ज वसतिगृह *180 विद्यार्थिनींची निवास क्षमता *दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनींचे वसतिगृह उभारणार अमरावती, दि. 18 : अमरावती जिल्ह्यात गत चार वर्षांत 22 हजार कोटींच्या कामांना चालना मिळाली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमत:च इतका मोठा निधी प्राप्त होऊन विकासाला मोठी गती मिळाली. आदिवासी विद्यार्थिनींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीप्रमाणेच उर्वरित प्रस्तावित वसतिगृहांच्या इमारतीही सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा उभारण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. एकात्मिक आदिवासी प्रकल्पातर्फे नवसारी येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 च्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, विजयराज शिंदे, प्रकल्प अधिकारी र

महात्मा गांधीजींच्या अमरावती भेटीला 85 वर्षे पूर्ण पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथाची सन्मानपूर्वक भेट

Image
अमरावती, दि. 17 : अमरावतीचे भूषण असलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या जगप्रसिद्ध संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दि. 16 नोव्हेंबर 1933 रोजी भेट दिली होती. या घटनेला काल 85 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आला.  माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांच्या हस्ते हा ग्रंथ श्री. वैद्य यांना देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महाराष्ट्र यांच्यातील अनुबंधाचा वेध घेणा-या ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ या ग्रंथाची प्रत आवर्जून भेट दिल्याबद्दल श्री. वैद्य यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.   महात्मा गांधी यांनी दि. 16 नोव्हेंबर 1933 ला मंडळाला भेट दिली होती. त्यावेळी मंडळातील विद्यार्थ्यांचे शारीरिक खेळ व नगर संरक्षक दलातील हरिजन पलटणीच्या कवायतींचे आयोजन मंडळाने केले होते. यादिवशी शहरात गांधीजींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ

पालकमंत्र्यांकडून शहरात स्वच्छता कामांची पाहणी बाजार व गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे स्वच्छता मोहिम राबवा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
              अमरावती, दि. 16:    शहरातील विविध बाजार, गर्दीची व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता काटेकोर असली पाहिजे. अस्वच्छतेबाबत स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करुन निविदा प्रक्रिया राबवावी व स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.    पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवकांसह आज शहरात स्वच्छता कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, पालिकेच्या आरोग्याधिकारी श्रीमती नैताम, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी श्री. कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.   स्वच्छता पाहणी दौऱ्यात प्रारंभी शंकरनगर परिसर, फरशी स्टॉप परिसर, गौरक्षणाच्या बाजूचा दस्तुरनगर परिसर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा परिसर, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड आदी परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भाजी बाजार व इतवारा बाजारातील भागांची पाहणी केली.    यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत

सामाजिक न्याय मंत्र्यांचा नागरिकांशी गुरुवारी ई- लाईव्ह संवाद

अमरावती, दि. 13 : सामाजिक न्याय विभागातर्फे गत चार वर्षांत राबविण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय व योजनांबाबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे दि. 15 नोव्हेंबरला सकाळी 11. 30 वाजता राज्यातील नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी व सामाजिक न्याय विभागातील कार्यरत सर्व कर्मचा-यांसमवेत ई- लाईव्ह संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण  http://elearning. parthinfotech.in  या लिंकद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रश्न विचारू इच्छिणा-या व्यक्तींनी 8384858685 या मोबाईल क्रमांकावर व्हाटसॲपद्वारे प्रश्न विचारावेत. हे प्रक्षेपण लाईव्ह व्हिडीओ, स्मार्ट फोन्स, टॅबलेटवर पाहता येईल. कार्यक्रमात सहभागाचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे. 00000

गोवर रुबेला आजाराच्या प्रतिबंधासाठी एमएमआर लस

Image
·          9  महिने ते 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील            सर्व बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिम ·          आरोग्य खात्याच्या तिसऱ्या महायज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ·          27 नोव्हेंबर पासून विशेष अभियान राबविणार     अमरावती, दि.6  :  गोवर आणि रुबेला या लहान मुलांना होणाऱ्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी   देश  पातळीवर नियोजनबद्ध रितीने कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. गोवर हा सर्वांना माहिती असलेला संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यु तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला  येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो. रुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून भारतात दरवर्

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश बोंडअळीसाठी जिल्ह्यात मदत निधी उपलब्ध

Image
अमरावती, दि. 5 : गतवर्षीच्या बोंडअळी नुकसानापोटी शेतक-यांसाठी जाहीर झालेल्या अनुदानाचे सुमारे 60 कोटी 86 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. या अनुदानापासून कुणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा  केला. गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे जिल्ह्यात कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे 182 कोटींची मदत जाहीर केली.  सुमारे 2 लाख 22 हजार 586 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 1 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीबाधित असल्याने 182 कोटी 60 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितला. शासनाने हा निधी तीन टप्प्यात उपलब्ध करुन दिला. तिस-या टप्प्यातील 60 कोटी 86 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी कृषी विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या कार्यवाहीमुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.  अनुदानाच्या तिस-या टप्प्यात अमरावती तालुक्याला सुमारे 2 कोटी 51 लाख, भातकुल
Image
कृषी विकास परिषदेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे -           आमदार डॉ. अनिल बोंडे अमरावती, दि. 1 : वरुड येथे नियोजित राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिले.             वरुड येथे दि. 4 ते 7 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.             डॉ. बोंडे म्हणाले की, परिषदेत विविध विभागांची महत्वपूर्ण योजनांची माहिती देणारी दालने असतील. परिषदेतून शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी देशभरातील नामवंत कृषी मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात येईल. आवश्यक तिथे प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शन करण्यात येईल. नामवंत कंपन्या, प्रयोगशील शेतकरी शास्त्रज्ञ आदींचा सहभाग परिषदेत असेल.             ते पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन हा महत्वाचा पूरक व्यवसाय असल्याने पशुसंवर्धन विभागाने प्रभावीपणे दालनाची मांडणी करावी. पशुप्रदर्शना

'जय महाराष्ट्र' मध्ये पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील

Image
            मुंबई ,  दि.  १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित  ' जय महाराष्ट्र '  कार्यक्रमात पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची  ' प्रदूषणमुक्त दिवाळी '  या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.              दिवाळी पर्यावरणपूरक होण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागाने केलेले नियोजन व जनजागृती ,  फटाक्यांमुळे हवा आणि ध्वनिमुळे होणारे गंभीर स्वरूपाचे परिणाम ,  दिवाळीच्या दिवसांत हजारो टनांनी वाढणारी घनक-याची समस्या व उपाययोजना ,  लहान मुलांमध्ये जागृती करण्यासाठी राबविण्यात आलेली विशष मोहिम याविषयी सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी  ' जय महाराष्ट्र '  कार्यक्रमातून दिली.

‘जलयुक्त’मुळे पिंपरी निपाणी परिसरात भूजलपातळी उंचावली जलसंधारणात पिंपरी निपाणी गावाचा पॅटर्न निर्माण

Image
अमरावती, दि. 1 : पारंपरिक सिमेंट बंधा-यांऐवजी जलयुक्त शिवार योजनेत रिचार्ज शाफ्ट व ट्रेंचच्या माध्यमातून पाणी मुरवल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपरी निपाणी व लगतच्या परिसराची भूजलपातळी उंचावली असून, कृषी उत्पादकतेतही भर पडली आहे.           जागतिक बँकेच्या सहकार्याने पाणीपुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभागातर्फे पिंपरी निपाणी व परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात भूशास्त्रीय अभ्यास करून तेथे जलयुक्त शिवार मोहिमेच्या माध्यमातून अनेक कामे राबवण्यात आली. त्याचा फायदा भूस्तरात पाणी मुरण्यास झाला आणि परिसरातील भूजलपातळीत वाढ झाली. जलयुक्त शिवार योजनेत जलसंधारणाच्या विविध प्रकारच्या कामांचा समावेश असल्याने परिसराची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तशी कामे राबविण्यात येतात. शिवाय, लोकसहभागाचे मोठे बळ योजनेला मिळाले. त्यातून जिल्हाभर झालेली अनेक कामे शेतीसाठी लाभकारक ठरत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असले तरी जलयुक्त शिवारच्या कामांमुळे एकूण जिल्ह्याच्या भूजलपातळीतील सरासरी तूट पाऊस कमी होऊनही 0.59 टक्क्यांनी भरून निघाली आहे. पूर्वी ही तूट वजा 1.86 टक्के होती.

व्यवसाय सुलभतेमध्ये भारताची 77 व्या स्थानी झेप; मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन

           मुंबई ,  दि.  3 1: जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) निर्देशांकामध्ये भारताने आजवरचे सर्वोच्च असे 77 वे स्थान गाठले असून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.             मुख्यमंत्री अभिनंदन करताना म्हणतात ,  2014 मध्ये भारत जागतिक व्यवसाय सुलभतेमध्ये 142 व्या स्थानी होता. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व्यवसाय सुलभता धोरणावर भर देऊन त्याची  यशस्वी अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मागील चार वर्षांत भारताने तब्बल 65 स्थानांची झेप घेतली आहे. मागील दोन वर्षांचा विचार केला तर ही झेप 53 स्थानांची (2015 मधील 130 क्रमांकावरुन 77 वर) आहे. तर मागील एका वर्षात 23 स्थानांनी (2017 मध्ये 100 वरुन 77) भारताने आगेकूच केली आहे.             ही कामगिरी प्रधानमंत्री श्री .  मोदी यांच्या कठोर मेहनतीचे फळ असून ही झेप म्हणजे जागतिक पटलावर भारताने नोंदवलेला मोठा विक्रम आहे. या प्रक्