Monday, November 5, 2018

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश बोंडअळीसाठी जिल्ह्यात मदत निधी उपलब्ध



अमरावती, दि. 5 : गतवर्षीच्या बोंडअळी नुकसानापोटी शेतक-यांसाठी जाहीर झालेल्या अनुदानाचे सुमारे 60 कोटी 86 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. या अनुदानापासून कुणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा  केला.
गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे जिल्ह्यात कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे 182 कोटींची मदत जाहीर केली.  सुमारे 2 लाख 22 हजार 586 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 1 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्र कपाशीबाधित असल्याने 182 कोटी 60 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितला.
शासनाने हा निधी तीन टप्प्यात उपलब्ध करुन दिला. तिस-या टप्प्यातील 60 कोटी 86 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी कृषी विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या कार्यवाहीमुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
 अनुदानाच्या तिस-या टप्प्यात अमरावती तालुक्याला सुमारे 2 कोटी 51 लाख, भातकुली 1 कोटी 83 लाख, नांदगाव खंडेश्वर 2 कोटी 95 लाख, चांदूर रेल्वे 7 कोटी 31 लाख, वरुड 5 कोटी 58 लाख, धामणगाव रेल्वे 6 कोटी 92 लाख, मोर्शी 6 कोटी 40 लाख, तिवसा 6 कोटी 23 लाख, चांदूर बाजार 3 कोटी 26 लाख, अचलपूर 5 कोटी 11 लाख, अंजनगाव सुर्जी 5 कोटी 65 लाख, दर्यापूर 4 कोटी 44 लाख, धारणी 2 कोटी 25 लाख, चिखलदरा 33 लाख असे वितरण झाले.
                                      00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...