" महावॉकेथॉन " रॅलीने शहरात रस्ते सुरक्षा जागृती
सार्वजनिक बांधकाम व परिवहनच्या 100 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

अमरावती, दि. 18 : परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आज शहरातून  " महावॉकेथॉन "  रॅलीद्वारे रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यात आली. रस्ते नियम व दक्षता याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या " महावॉकेथॉन"  रॅलीमध्ये  सुमारे 100 हून अधिक अधिकारी-कर्मचारी व नागरिक  सहभागी होऊन २ किलोमीटर्सचे अंतर चालून ही महावॉकेथॉन रॅली यशस्वी केली.
          सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाच्या सहकार्याने निघालेल्या या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.टी. गीते  व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. नवघरे ,श्री. काझी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते 
राज्यात एकाच दिवशी- एकाच वेळी महावॉकेथॉन रॅली काढण्यात आली. शहरात आरटीओ ऑफिस,गर्ल्स हायस्कूल चौक,पंचवटी चौक, कॅम्प परिसर असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीमध्ये वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे याबाबत माहिती देणारे संदेश प्रसारित करण्यात आले.  नागरिक, तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी  रस्ते सुरक्षेबाबत घोषणाही दिल्या. या रॅलीत बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व अधिकारी,कर्मचारी, कंत्राटदार तसेच सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा  सहभाग होता. 
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती