शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित अमरावती, दि.21: अमरावती समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुला-मुलींचे 24 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. त्यामध्ये तालुकास्तरावर 15 व विभागीय स्तरावर 9 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सामाजिक आरक्षणानुसार शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे टक्केवारी निर्धारित केली आहे. अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, आर्थिकदृष्टया मागास 5 टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अपंग / दिव्यांग 3 टक्के, अनाथ 2 टक्के यानुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. सामाजिक आरक्षणानुसार रिक्त जागेबाबतची सविस्तर माहिती सबंधित गृहपाल यांच्याकडे उपलब्ध आहे. तालुक्यातील शासकीय वसतिगृहात 40 टक्के शालेय विद्यार्थी तर 60 टक्के कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी राखीव आहे. विभागीय स्तरावरील वसतिगृहामध्ये शालेय प्रवेशासाठी जागा रिक्त ठेवण्यात येत नाही
Chan
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete