Thursday, November 1, 2018

'जय महाराष्ट्र' मध्ये पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील


            मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची 'प्रदूषणमुक्त दिवाळीया विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.००या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
             दिवाळी पर्यावरणपूरक होण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागाने केलेले नियोजन व जनजागृतीफटाक्यांमुळे हवा आणि ध्वनिमुळे होणारे गंभीर स्वरूपाचे परिणामदिवाळीच्या दिवसांत हजारो टनांनी वाढणारी घनक-याची समस्या व उपाययोजनालहान मुलांमध्ये जागृती करण्यासाठी राबविण्यात आलेली विशष मोहिम याविषयी सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...