Posts

Showing posts from February, 2018
Image
इमारत बांधकाम कामगारांसाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजना महाराष्ट्रातील 25 लाख इमारत बांधकाम नोंदणीचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दि. 23 : महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत 25 लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य कामगार विभागाने पूर्ण करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सहयाद्री अतिथीगृह येथे आज विशेष नोंदणी अभियानाचा ई शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर , सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले तसेच वेबकास्टदवारे नागपूरहून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अमरावतीहून पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील या अभियानात जोडले गेले होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की , इमारत बांधकाम कामगार उंच उंच इमारती तयार करण्यात आपला महत्वाचा सहभाग देतात. पण त्यांचे जीवन नेहमीच दुर्लक्षित राहते. आज जाहीर करण्यात आलेली अटल विश्वकर्मा सन्मान योजना महाराष्ट्रातल्या 25 लाख कामगारांपर्यंत पोहोचणार आहे.या अभियान
Image
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन मुंबई , दि. 23 : संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्षा निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादनकरण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले , कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर , सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर , उपसचिव छाया वडते , कक्ष अधिकारी ललित सदाफुले , अनिल चवरे आद ी उपस्थित होते.
Image
बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात 20 हजार नोंदणीचे उद्दिष्ट अभियानातील 28 योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा -           पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अमरावती, दि. 23 : कामगार विभागातर्फे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात 20 हजार नोंदणीचे उद्दिष्ट असून, ते पूर्ण करण्यात येईल, तसेच नोंदणी करुन यातील    विविध 28 योजनांचा कामगारांनी    लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.                 कामगार विभागातर्फे बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाचा ई- शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाला. या कार्यक्रमात अमरावतीहून वेबकास्टद्वारे पर्यावरण राज्यमंत्री श्री. पोटे-पाटील, जिल्हाधिकारी अभिजित बांगर आदींनी सहभाग घेतला.     उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदीही उपस्थित होते.                अमरावती जिल्ह्यात नोंदणीसाठी सर्व तालुके व परिसराचा विचार करून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्
Image
70 वर्षांनी प्रकाशमान झाले घारापुरी बेट विद्युतीकरणाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न घारापुरी बेट विदेशी पर्यटकांच्या पसंतीचे पाहिले स्थान बनविणार - मुख्यमंत्री मुंबई ,   दि. 22 : जागतिक   वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर पर्यटकांच्या दृष्टीने सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार असून     विदेशी पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे स्थान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.     केबल कार ,   मिनी ट्रेनच्या माध्यमातून या बेटाचे सौंदर्य पर्यटकांना अनुभवता यावा यादृष्टीने विचार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगीतले. मुंबई जवळ असलेल्या घारापुरी (एलीफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,   पर्यटन मंत्री जयकुमार रावल ,   केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ,   रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ,   खासदार श्रीरंग बारणे ,   आमदार प्रशांत ठाकूर ,   मनोहर भोईर आदी उपस्थित होते. मुख्य
Image
नागपूर जिल्हा आढावा बैठक गारपिट बाधित पिकांसाठी भरपाई अनुदान तात्काळ वाटप करा -मुख्यमंत्री मुंबई , दि 22 ; नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांसाठीच्या भरपाईच्या अनुदानाचे तात्काळ वाटप करावे , असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर जिल्ह्यातील पीक नुकसानासंदर्भात आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी नागपूर परिसरात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांचा आढावा घेतला. यात संत्रा , धान , गहू , हरभरा , भाजीपाला , केळी , मोसंबी या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतक-यांना तातडीने भरपाई अनुदानाचे वाटप करण्याबाबत सबंधितांना आदेश दिलेत. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतक-यांचे बोंड अळीमुळे नुकसान झाले होते. त्याचाही आढावा या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला. यासंदर्भातली मदतही जाहीर करण्यात आली होती , मात्र तांत्रिक कारणांमुळे जे तालुके यातून सुटले होते त्या तालुक्यांतील बोंडअळी ग्रस्त कापूस उत्पादक शेतक-यांना देखील तात्काळ मदत देण्यात यावी यासंदर्भातील शासन
Image
अस्मिता कार्ड , अस्मिता फंड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ अस्मिता योजनेच्या मोबाईल ॲप , लोगोचे अनावरण मुलींना मिळणार ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीन मुंबई , दि. २२ : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकीन देण्याची योजना ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाणार आहे. या योजनेचा लोगो , योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले मोबाईल ॲप आणि डिजीटल अस्मिता कार्ड यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात करण्यात आले. येत्या महिला दिनापासून म्हणजे ८ मार्चपासून अस्मिता योजना सुरु होत आहे. ५० मुलींच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी मुख्यमंत्र्यांची अस्मिता स्पॉन्सरशीप यावेळी अस्मिता फंडाचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. https://mahaasmita.mahaonline.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी लोक अस्मिता स्पॉन्सर (अस्मिता प्रायोजक) होऊ शकतील. या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी ल
Image
‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई , दि. 22 : पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी लिखित ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ' या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले. परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील , परिवहन मंत्री दिवाकर रावते , कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर , शिक्षण मंत्री विनोद तावडे , ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे , ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , पर्यावरण मंत्री रामदास कदम , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर , पदुम मंत्री महादेव जानकर , सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. या पुस्तकात शासकीय व निमशासकीय काम करण्याच्या कार्यालयीन पध्दती याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  झिरो पेंडन्सीचा पुणे पॅटर्न 18 एप्रिलपासून राज्यभर लागू होणार आहे. 0000
Image
औषधी वनस्पतींच्या संशोधनासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल -          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 22 : महाराष्ट्रातील औषधी वनस्पतीची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता व या वनस्पतीच्या संकलनाचे उत्तम काम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केले आहे.या व अशा पध्दतीच्या संकलन व संशोधनासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीचे संकलन या डेटा बेसचे प्रकाशन मुख्यमंत्रीश्री.फडणवीस यांच्या हस्ते आजकरण्यात आले.यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधानसचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन , भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांच्यासह या प्रकल्पात सहभागी वैज्ञानिक , तज्ज्ञ उपस्थित होते. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातर्गत या प्रकल्पाच्या समन्वयाचे काम आघारकर संशोधन संस्था , पुणे व अन्य १४ संस्थानी केले. सहकार्याने ४ वर्षाच्या परिश्रमातून ही माहिती संकलित करण्यात आलेली आहे.सुमारे 200 क्षेत्रीय विद्यार्थी क्षेत्रीय कार्यात सहभागी  झाले होते.या डेटा बेसमध्ये ४०० वनस्पतीची विविधता आ