‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ पुस्तकाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 22 : पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी लिखित ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल' या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले.
परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री रामदास कदम,
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पदुम मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
या पुस्तकात शासकीय व निमशासकीय काम करण्याच्या कार्यालयीन पध्दती याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
 झिरो पेंडन्सीचा पुणे पॅटर्न 18 एप्रिलपासून राज्यभर लागू होणार आहे.
0000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती