'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :
'इमरजिंग टेक्नॉलॉजी इनसेक्टर्स' परिसंवाद
पर्यायी इंधन वापर धोरणामुळे राज्यात उद्योगांना मोठी संधी
मुंबई, दि. 19:देशाने वाहनांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले असूनयासाठी महाराष्ट्राने इलेक्ट्रीक वाहन धोरण लागू केल्याने राज्यात उद्योगांसाठी मोठीसंधी निर्माण झालीआहे, असे मत 'इमरजिंग टेक्नॉलॉजी इनसेक्टर्स' या चर्चा सत्रात सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
बी के सी येथे एम एम आर डी मैदानावरील मॅग्नेटीक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ या आंतराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये इमर्जिंग टेक्नॉलॉजी इनसेक्टर्स हा परिसंवाद झाला. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगाचे कार्यकारी संचालक डॉ पवन गोयंका, कानपूर आयआटी चे प्रा. सिध्दार्थ पांडा, टाटा पॉवर आणि सोलर सिस्टीम्सचे शिष खन्ना, सी आय आय चे सुमित सिन्हा, हिंदुजा सिस्टिम्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माहेश्वरी, एनडीटीव्हीच्या पर्यावरण रिपोर्टर गार्गी रावत यांनी सहभाग घेतला.
डॉ. गोयंका म्हणाले, प्रदषण रोखणे, पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे आदींसाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढणे गरजेचे आहे. केंद्र सरकार ने या साठी पावले उचलताना राज्यांनी यासाठी काय देवनियमांमध्ये सुधारणा कराव्या तयासाठी आवश्यक उद्योग, वाहने आदी धोरण बनविण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कार्यवाही महत्वपूर्ण ठरली आहे. राज्याने मागच्या आठवड्यात धोरण घोषित केले आहे. यामुळे या क्षेत्रातील वाटचाली ची रुपरेखा सर्वांसमोरआलीआहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रात असलेली स्पर्धा पाहता यातील देशाच्या प्रगतीसाठी जगाच्या नकाशावर वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारे ठरेल. चीनने आठ वर्षांपूर्वी या गोष्टीला प्राधान्य देऊन आपल्या क्षमतावाढी साठी पावले टाकलीआहेत, असे डॉ.गोयंका म्हणाले.
या प्रसंगी श्री.खन्ना म्हणाले, सौरर्जा उत्पादनात ८०त १०० िगावॅट क्षमतेने वाढ होत असून जागतिक स्थिती पाहता या मध्ये ७४८ िगावॅट क्षमता वाढीची गरज आहे. यामध्ये असणारे अडथळे कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु असून पर्यावरण, आरोग्य आदींचा विचार करता उर्जे चा हा स्त्रोत र्लक्षित करता येणे शक्य नाही.
फ्लेक्झीबल इलेक्ट्रानिक्स मधील संधींचा वेध घेताना आयआयटीचे प्रा. पांडा यांनी उद्योजकांनी यामध्ये गुंतवणकीसाठी ढे येण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, इलेक्टॉनिक्स मटेरिअल वापराची व्याख्या यामुळे बदलते आहे. पारंपरिक पध्दती ऐवजी पॉलिमर्ससारख्या लभूत मटेरिअलचा येथे वापर होणार असून त्याचा वापर सेन्सर्स च्या क्ष्म उत्पादना मध्ये होऊन किंमत, र्जा वापर या मध्ये यामुळे क्रांती दिसून येईल.
श्री. सिन्हा यांनी नवकरणीय र्जा वापरामुळे बदलणारे तंत्राचे फायदेत्यातील मर्यादा विषद करताना यामुळे संशोधनाच्या संधी महत्वपूर्ण आहेत असे सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरीच्या वापरामुळे याक्षेत्रातील मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याला शासनाचे धोरण पूरक ठरणार आहे. या संधींचा वेध घेतला जावा.
कपिल माहेश्वरी यांनी सौर उर्जा उत्पादनासाठी भौगालिक क्षेत्राची गरज असून त्या साठी रहिवासी क्षेत्रातील रुफटॉप संकल्पना हा कळीचा मुद्दा ठरुन त्याचा आर्थिक परिणाम नागरीकांना लाभ दायक ठरु शकतो. या साठी सर्वस्तरापर्य जनजागृती व्हावीअसे त्यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती