नांदेडचे श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअम आणि अध्यासन संकुल
आधुनिकीकरणासह इमारतीसाठी
केंद्र सरकारकडून 67 कोटी - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7 : श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने नांदेड येथे प्रस्तावित केलेल्या स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि अध्यासन संकुलाच्या इमारतीसाठी केंद्र सरकारकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
श्री गुरूगोविंदसिंहजी यांचे 350 वे जयंती वर्ष गेल्या वर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरे झाले होते. श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राची इमारत बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला असून या विभागाने स्टेडिअमच्या आधुनि
कीकरणासाठी 45 कोटी आणि श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी 22 कोटी रुपये असा एकूण 67 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या विभागाचे राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि  सांस्कृतिकराज्यमंत्रीडॉ. शर्मा यांचे आभार मानले आहेत.
-----000-----

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती