पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 63 कोटी निधीला मान्यता
          अमरावती दि. 20 : मुख्यमंत्री  ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील सुमारे 115 कि.मी. लांबीच्या रस्त्यांसाठी  63 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी यासाठी ग्रामविकास विभागाकडे विशेष पाठपुरावा केला. मेळघाटसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रस्त्यांचा यात समावेश आहे.
          पालकमंत्री श्री. पोटे-पाटील हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील विविध रस्त्यांची निवड करुन त्यांची बांधणी, देखभाल दुरुस्ती यासाठीचा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला व तो तत्काळ मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार 2017-18 साठी 48.14 कोटी रुपये तर 2016-17 साठी 14.91 रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. 
                                           अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर  
          या निधीतून अमरावती तालुक्यातील प्रजिमा-33 ते मोगरा हातला यासाठी 4 कोटी53 लाख तर रामा-280 ते मोरांगणा रस्ता सुधारणेसाठी 66 लाख, भातकुली तालुक्यातील प्ररामा-14 अर्थात आष्टी ते मकरमपूर रस्त्यासाठी 7 कोटी 10 लाख तर चांदूरबाजार तालुक्यातील रामा-292 ते आखतवाडा-खरवाडी रस्त्यासाठी 2 कोटी 61 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या तिन्ही रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी 4 चार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी कारपेटमध्ये निरुपयोगी प्लास्टिकचा वापर, मातीकामात फ्लाय ॲशचा वापर आदी अद्ययावत विकास तंत्रज्ञानही वापरले जाणार आहे.
                                       मेळघाटसह सर्व तालुक्यांत रस्ते
अमरावती तालुक्यातील प्रजिमा-69 अर्थात पुसदा-देवरा-फाजलपूर रस्त्यासाठी 3 कोटी 63 लाख, प्रजिमा-27 ते थुगाव 1 कोटी 23 लाख, रामा-24 अर्थात भंडारज-धनवाडी-जवर्डी रस्त्यासाठी 1 कोटी 92 लाख, चांदूरबाजार तालुक्यातील बोरज-अलीपूर रस्त्यासाठी 2 कोटी 56 लाख, दहिगाव रसुलपूर- तालुका सीमा रस्त्यासाठी 2 कोटी 5 लाख, चिखलदरा तालुक्यातील घटांग- भुलोरी लवादा रस्त्यासाठी 5 कोटी 98 लाख रुपये तर धारणी तालुक्यातील मालूर-घोटा-भुलरी-हतीदा साठी 6 कोटी 78 लाख रुपये व उतावली-चाकरदा रस्त्यासाठी 4 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
          मोर्शी तालुक्यातील लिहिदा, आसोना, तळणी-पार्डी या रस्त्यासाठी 5 कोटी 68 लाख रुपये तर तिवसा तालुक्यातील रामा-308 वरील वऱ्हाते माळगाव रस्त्यासाठी 2 कोटी 58 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वरुड तालुक्यातील रामा-47 वरील जरुड-पिंपळखुटा वावरोळी रस्त्यासाठी 3 कोटी 44 लाख व रामा-295 वरील वंडली  थडीपवनीसाठी 1 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
          चांदूर रेल्वे तालुक्यातील रामा-294 वाई ते किरजवळा, धोत्रा रस्त्यासाठी 4 कोटी 23 लाख रुपये तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रजिमा-12 खरबी गुंड ते धानोरा शिक्रा रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याशिवाय या रस्त्यांच्या देखभालीसाठी 3 कोटी 36 लाख रुपये मंजूर आहेत.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती