'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :

'लॉजिस्टीक आणि सप्लाय चे नया क्षेत्रात गुंतवणूकी च्या संधी' परिसंवाद
सप्लाय चेन साठी राज्य भौगोलिक दृष्ट्या उत्तम
            मुंबई, दि. 19:उद्योग व्यापार क्षेत्रात महत्वाची समजली जाणारी सप्लाय चेन उभारणी करण्यासाठी राज्य भौगोलिक दृष्ट्याउत्तम असल्याचे मत आज 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या जागतिक गुंतवणूक परिषदेत झालेल्या एका परिसंवादात मान्य वरांनी व्यक्त केले. जागतिक व्यापार वृद्धीच्या अनुषंगाने लॉजिस्टीक आणि सप्लाय चेन या क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात उद्योजक प्रदीप बॅनर्जी, रमेश नायर, हान्डेडिल्टेमीस आणि अमीत कुमार हे सहभागी होते.
            या परिसंवादात झालेल्या चर्चेतून अनेक बाबीपुढे आल्या. राज्यात बदललेल्या उद्योग स्नेही धोरणांमुळे आता राज्यात गुंतवणूक करणे सोपे आणि आश्वासक झाले आहे. वाढते शहरीकरण आणि बदलत्या परिस्थितीत या उद्योगासाठी लागणाऱ्या गरजा बदलल्या आहेत. त्या दृष्टीने नव्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे. येत्या दहा वर्षात या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्याचे चित्र बदलणार आहे. त्या दृष्टीने राज्यात सकारात्मक बदल घडत आहेत या वर उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती