Tuesday, February 20, 2018

'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स :  12 लाख कोटीची गुंतवणूक
43 सामंजस्य करारावर मुख्यमंत्री यांच्याउ पस्थितीत स्वाक्षऱ्या
            मुंबई दि. 19 :मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 या गुंतवणकदाराच्या परिषदेत आज सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध43सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्रात12लाख कोटींची  गुंतवणूक होणार आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयांनी गुंतवणूक होणार असून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारात देश विदेशातील नामांकित उद्योग समूहांचा समावेश आहे.यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            यात प्रामुख्याने स्पॅनडेक्स 12 हजार 350 कोटी, जिनस पेपर नंदुरबार1 हजार 50कोटी, येस बँक10 हजार कोटी, राज बिल्ड इन्फ्रा एलएलपी, 2 हजार 946 कोटी, के. रहेजा डेव्हलपर्स 4 हजार 850 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज इंडस्ट्रियल सिटी 12 हजार कोटी, क्रेडाई महाराष्ट्र 1 लाख कोटी, नारडेको 90 हजार कोटी, एमसीएचआय क्रेडाई 75 हजार कोटी, खालीजी कमर्शिअल बँक ॲण्ड भूमिराज 50 हजार कोटी, पोतदार हाउसिंग 20 हजार कोटी, मंगल नमोह गृहनिर्माण 25 हजार कोटी, अदानीग्रीनएनर्जी लिमिटेड 7 हजार कोटी, टाटा पॉवर कंपनी 15 हजार 560 कोटी, रिन्यू पॉवर व्हेंचर 14 हजार कोटी, जेएनपीटी 7 हजार 915 कोटी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी 13 हजार 800 कोटी, व्हर्जीन हायपरलूप 40 हजार कोटी, यासह एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एस बँक, बीव्हीजी लाईफ, नेट मॅजिक, रेडिमेड गारमेंट क्लष्टर, वलसाड जिल्हा सहकारी बँक, कोकण बांबू आणि केन विकास केंद्र, कायनेटीक ग्रीन, बांबू फर्निचर, सोलास इंडस्ट्रिअल सिटी वाडा आदसोबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
            यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्ट व रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय झिलस्तोव्ह यांची भेट घेवून चर्चा केली. या भेटीत विविध क्षेत्रातील गुंतवणूक कौशल्य विकास व रोजगार निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.

000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...