इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचा समारोप

 विद्यार्थ्यांत वैज्ञानिक व सामाजिक जाणीव जागविणारे प्रदर्शन    
-         प्राचार्य रवींद्र आंबेकर
अमरावती दि. 6 : इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात शेती व पर्यावरणाला उपयुक्त अनेकविध उत्तम प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणीव व सामाजिक भान जागृत करणारे ठरले, असे  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी आज येथे सांगितले.    
अमरावती व यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने ज्ञानमाता विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, अधिक्षक (वेतन व भविष्य निर्वाह निधी) दिनेश बिजवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर अ. सामी, श्री. एजाज, डॉ. गुडदे, श्री. पाटील, श्री. पट्टलवार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिव निर्माण झाल्याने अंधश्रद्धा, अपसमजांना आळा बसतो. त्याचप्रमाणे, प्रदर्शनासारख्या उपक्रमातून शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संवाद वाढीस लागतो, असे प्रा. आंबेकर म्हणाले. विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला चालना देण्याचे कार्य या उपक्रमातून होत आहे, असे श्री.  बिजवे यांनी सांगितले.

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात उत्कृष्ट प्रतिकृती सादर करणा-या अमरावती जिल्ह्यातील 6 व यवतमाळ जिल्ह्यातील 5 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती टाके यांनी यावेळी दिली.   
                    राज्यस्तरासाठी निवड झालेले विद्यार्थी
अमरावती : सलोणी पंडागडे, आम्रपाली चिंचे, उदय रहाटे, ऋषिकेश वानखडे, शिवांशिव, कृतीका दुंबरे
यवतमाळ : ओम विठ्ठल निस्ताने, अनिकेत काकडे, कुणाल वरखडे, मैथिली थावटी, प्रणव मुंधडा.  
           अख्तर खान यांनी सूत्रसंचालन केले. श्री. दिवे यांनी आभार मानले.
000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती