Posts

Showing posts from April, 2023

कृषी मंत्र्यांकडून अमरावती विभाग खरीप नियोजनाचा आढावा निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी काटेकोर कार्यवाही करा - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Image
  कृषी मंत्र्यांकडून अमरावती विभाग खरीप नियोजनाचा आढावा निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी काटेकोर कार्यवाही करा -    कृषी मंत्री अब्दुल सत्तार     कृषी विभागातील पदे 100 दिवसांत भरणार अमरावती, दि. 28 : आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर कार्यवाही करावी. विभागात आवश्यक त्या ठिकाणी रेल्वे रेक व इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल, तसेच कृषी विभागातील पदभरती 100 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. अधिकाधिक शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळवून देतानाच, कुणीही नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाचा आढावा कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नियोजनभवनात घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, प्र. विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस., संचालक (नियोजन) सुभाष नागरे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, संचालक (विस्तार) दिलीप झेंडे, संचालक (गुण

कृषी मंत्र्यांच्या हस्ते मोबाईल संत्रा सेंटरचे लाभार्थ्यांना वितरण

Image
  कृषी मंत्र्यांच्या हस्ते   मोबाईल संत्रा सेंटरचे लाभार्थ्यांना वितरण               अमरावती, दि.२८: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अमरावती विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक झाली. तत्पूर्वी बडनेरा येथील दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे निर्मित मोबाईल संत्रा सेंटरचे वितरण कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटाला करण्यात आले.         सालोरा खुर्द येथील संत ज्ञानेश्वर पुरुष बचत गटाला संत्रा मोबाईल सेंटर वितरित करण्यात आले . या गटातील ११ पैकी चार शेतकऱ्यांकडे संत्रा पीक आहे . तसेच गावातील बारा शेतकऱ्यांनी या गटात संत्रा पुरवण्याबाबत हमीपत्र दिले आहे .तसेच तिवसा महिला ॲग्रो उत्पादक केंद्र यांनाही यावेळी संत्रा मोबाईल सेंटरचे वितरण करण्यात आले .       संत्रा मोबाईल सेंटर हे दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राने स्वतः निर्माण केली आहे. जिल्हा नियोजन व विकास समिती मधील नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत   या यंत्रामध्ये मानवी हस्त स्पर्शाशिवाय संत्र्याची साल, बिया पूर्णतः विलग होवून रस निघतो. त

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम मोहिम स्तरावर राबविणार

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा   गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी  ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम मोहिम स्तरावर राबविणार            अमरावती ,   दि.   27   :   शासकीय   योजना गतिमान करताना त्याचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी   ' शासकीय   योजनांची   जत्रा '   हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम   अभियान स्तरावर राबवून अद्यापपर्यंत   शासकीय   योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत करण्यात आले.               उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मुख्यमंत्री सचिवालयाचे   कैलास देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके व विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनीही ऑनलाईन उपस्थित राहून माहिती दिली.               शासकीय   योजनांची   अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व गरजूंना लाभ मिळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.   विविध    विभागांमार्फत राबविल्या जाणा-या   शासकीय   योजनांची   माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी राबविल्या जाणार पुनर्वसन अभियान - निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके

Image
  रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी राबविल्या जाणार पुनर्वसन अभियान - निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके              अमरावती दि. 27: महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये 1 ते 31 मे 2023 या कालावधीमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी पुनर्वसन अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, संरक्षण अधिकारी यांचा सहभाग राहणार असून रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी दिले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाकक्षात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण समिती, बालविवाह, चाईल्ड लाईन, पुनर्वसन व बालकल्याण समिती, टास्क फोर्स, अपराधी परिविक्षा अधिनियम 1958, जिल्हा महिला सल्लागार या विभागांचा नुकताच आढावा घेण्यात आला, त्यावेळी श्री. घोडके बोलत होते.               महिला व बालविकास विभागातंर्गत येणाऱ्या विविध विभागांनी आपसात समन्वय साधून याबाबत तात्काळ उपायोजना करण्याचे सांगून श्री

कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नियोजन भवनात खरीपपूर्व आढावा बैठक

Image
कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नियोजन भवनात खरीपपूर्व आढावा बैठक             अमरावती, दि. 27 : अमरावती विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शुक्रवारी (28 एप्रिल) सकाळी 11 वाजता होणार आहे. जून महिन्यापासून सुरू होणा-या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी महसूल विभागनिहाय पूर्वतयारी बैठका आयोजित केल्या आहेत. त्यानुसार अमरावती येथील बैठक शुक्रवारी होईल. विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व कृषी प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने बियाणे, खत, कीटकनाशके आदी उपलब्धता, आवश्यकता व विविध कृषी योजनांची अंमलबजावणी याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. कृषी मंत्री श्री. सत्तार यांचा दौरा पुढीलप्रमाणे : गुरूवारी (27 एप्रिल) सायंकाळी 7 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शुक्रवारी (28 एप्रिल) रोजी सकाळी 10.30  वाजता शासकीय विश्रामगृह येथून नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प

मातंग समाजाला जिल्ह्यात 1 हजार 100 घरकुलांचा लाभ मिळणार

  मातंग समाजाला जिल्ह्यात 1 हजार 100 घरकुलांचा लाभ मिळणार    अमरावती, दि. 26 : रमाई आवास योजना राज्यात सन 2010 पासून राबविण्यात येत असून या योजनेत अनुसूचित जातीमधील घटकांना लाभ दिला जातो. यामध्ये प्राधान्याने जातीय दंगलीमधील घरांचे नुकसान झालेली व्यक्ती, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित, अनुसूचित जातीची पात्र व्यक्ती, पूरग्रस्त क्षेत्र, वीरपत्नी महिला यांना प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर मातंग समाजाच्या पात्र व्यक्तींना राज्यात सन 2023-24 मध्ये 25 हजार घरकुलांना प्राधान्याने लाभ देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.   आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत सामाजिक न्याय पर्व दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तसेच या विषयावर दि. 27 एप्रिल 2023 रोजी सर्व संबंधित क्षेत्रीय यंत्रणेची आढावा सभा आयोजित करण्यात आली आहे. मातंग समाजाला रमाई घरकुलांचा प्राधान्याने लाभ देण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नगरपरिषदा यांना सूचित करण्यात आले असून अर्ज वाटप करण्यात येत आहे.  

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम बैठक

Image
  जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम बैठक कृषी निविष्ठांबाबत परिपूर्ण नियोजन करा -   जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती , दि. 26 : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे , खते , कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.   जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक महसूलभवनात झाली , त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते , ‘ आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने , कृषी उपसंचालक अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.         जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6 लाख 81 हजार हेक्टर असून , सोयाबीन , कापूस , तूर ही मुख्य पीके आहेत. गतवर्षी खरीप पिकाचे 6 लाख 74 हजार हे. पेरणी क्षेत्र होते. येत्या हंगामासाठी सोयाबीन , कपाशी , तूर , मूग , ज्वारी , उडीद व मका आदी पिकांसाठी 83 हजार 24 क्विंटल बियाण्याची गरज आहे. सोयाबीन या मुख्य पीकासाठी 66 हजार 938 क्विंटल , कपाशीसाठी 5 हजार 850 क्विंटल व तुरीसाठी 4 हजार 746 क्विंटल बियाणे लागणार आहे.

गुंतवणूक व रोजगारवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारा - उद्योग मंत्री उदय सामंत

Image
  ‘पीएम मित्रा पार्क’च्या कामांचा उद्योग मंत्र्यांकडून आढावा गुंतवणूक व रोजगारवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारा - उद्योग मंत्री उदय सामंत     अमरावती, दि. 22 : अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात ‘पीएम मित्रा पार्क’ हा महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण झाले असून, येथे गुंतवणूकीसाठी अनेक मोठ्या उद्योगांनी तयारी दर्शवली आहे. परदेशी गुंतवणूक व मोठी रोजगारनिर्मिती या प्रकल्पातून साध्य होणार आहे. त्यादृष्टीने येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा   उभाराव्यात, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. ‘पीएम मित्रा’ अंतर्गत नियोजित ‘मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क’च्या अनुषंगाने बैठक उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वसाहतीतील ‘सीईपीटी’ सभागृहात झाली. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, ‘सीईपीटी’चे डॉ. किशोर मालवीय, उद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य अभियंता राजेश झंजाळ, पोलीस आयुक्त