Wednesday, April 26, 2023

मातंग समाजाला जिल्ह्यात 1 हजार 100 घरकुलांचा लाभ मिळणार

 


मातंग समाजाला जिल्ह्यात 1 हजार 100

घरकुलांचा लाभ मिळणार


 

 अमरावती, दि. 26 : रमाई आवास योजना राज्यात सन 2010 पासून राबविण्यात येत असून या योजनेत अनुसूचित जातीमधील घटकांना लाभ दिला जातो. यामध्ये प्राधान्याने जातीय दंगलीमधील घरांचे नुकसान झालेली व्यक्ती, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित, अनुसूचित जातीची पात्र व्यक्ती, पूरग्रस्त क्षेत्र, वीरपत्नी महिला यांना प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर मातंग समाजाच्या पात्र व्यक्तींना राज्यात सन 2023-24 मध्ये 25 हजार घरकुलांना प्राधान्याने लाभ देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

  आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत सामाजिक न्याय पर्व दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तसेच या विषयावर दि. 27 एप्रिल 2023 रोजी सर्व संबंधित क्षेत्रीय यंत्रणेची आढावा सभा आयोजित करण्यात आली आहे. मातंग समाजाला रमाई घरकुलांचा प्राधान्याने लाभ देण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नगरपरिषदा यांना सूचित करण्यात आले असून अर्ज वाटप करण्यात येत आहे.

 

मातंग समाजासाठी सन 2023-24 साठी 1 हजार 100 घरकुलांचे उदिद्ष्ट पहिल्या टप्प्यात यंत्रणेला निर्धारित करून देण्यात आले आहे. याची सुरुवात नगरपंचायत शेंदुरजनाघाट व अचलपूर येथून करण्यात आली असून तेथे मातंग समाजाच्या लाभार्थ्यांना अर्ज वाटप करणे, वस्तीत स्वच्छता अभियान राबविणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची माहिती देणे तसेच रमाई आवास योजना सन 2023-24 करिता पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करणे, इत्यादीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे. मातंग समाजाच्या सर्व पात्र व्यक्ती तसेच अनुजातींच्या पात्र व्यक्तींनी आपले अर्ज संबंधित पंचायत समिती, नगरपरिषद, व महानगरपालिकेला सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...