Thursday, April 13, 2023

अनुसूचित जाती घटकांच्या बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना

 

अनुसूचित जाती घटकांच्या बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना

 

अमरावती, दि. 13 : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधने देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती घटकांच्या बचत गटांसाठी ही योजना महत्वाची ठरत आहे.  

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना साडेतीन लाख रूपयांच्या मर्यादेत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळतात. त्यात 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा आहे. किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने त्याद्वारे मिळतात. रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण कार्यालयाने केले आहे.         

गतवर्षीसाठी योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मंजूर उद्दिष्टापेक्षा अधिक पात्र प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे या योजनेत लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सोडत होणार आहे. त्यासाठी संबंधित गटाचे अध्यक्ष किंवा सचिव आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...