संविधान
जनजागृती रॅलीचे आयोजन
समता
डिजीटल रथाच्या माध्यमातून योजनांची माहिती
अमरावती, दि. 13 : सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत संविधान जनजागृती चित्ररथ व
बाईक रॅलीचे आज शहरात आयोजन करण्यात आले होते. विभागाचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त
सुनील वारे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ केले.
सहायक आयुक्त (समाजकल्याण) माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र
जाधवर, सहायक संचालक डॉ. दिनेश मेटकर, लेखाधिकारी विश्वास डाखोरे, जनसंपर्क अधिकारी
मंगला देशमुख, विशेष अधिकारी राजेंद्र भेलव यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी
यावेळी उपस्थित होते.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष तसेच राजर्षी छत्रपती
शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीने
सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात
येणाऱ्या विविध योजनांची माहिती दर्शविणारे डिजीटल डिस्प्ले चित्ररथात समावेश करण्यात
आला होता. या समता डिजीटल रथाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वदूर संविधान व विविध शासकीय
योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
चित्ररथ व बाईक रॅलीचा शुभारंभ सामाजिक न्याय भवन येथून झाला. पोलीस
आयुक्तालय, पोलीस कल्याण पेट्रोल पंप, राणी दुर्गावती चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
चौक याप्रमाणे रॅलीचे मार्गक्रमण झाले. आंबेडकर चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीचा समारोप करण्यात आला.
00000


.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment