धारणीत अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीबाबत पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 


धारणीत अवकाळी पाऊस व गारपीट

नुकसानीबाबत पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 31 : धारणी तालुक्यात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वा-यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. तेथील सर्व सेवा सुरळीत करून नुकसानीबाबत पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

धारणीत अवकाळी पावसाने झाडे कोसळल्याने काही रस्ते बंद झाले होते. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ही स्थिती लक्षात घेऊन रस्ते, वीज आदी सेवा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिका-यांना दिले. त्यानुसार झाडे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.

अवकाळी पावसाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. काही ठिकाणी घरांची पडझड झाली. या नुकसानीचे पंचनामे 48 तासांत सादर करण्यात येतील, असा अहवाल तहसीलदारांनी दिला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती