Posts

Showing posts from November, 2022

समाजकल्याण विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा सामाजिक न्याय साकारण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे - विविध मान्यवरांचे आवाहन

Image
  समाजकल्याण विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा सामाजिक न्याय साकारण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे - विविध मान्यवरांचे आवाहन अमरावती, दि. 29 : राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वांचे संरक्षण करत असतानाच सामाजिक न्याय साकारण्यासाठी शासन, प्रशासन, माध्यमे, संस्था, नागरिक या सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन विविध वक्त्यांनी पत्रकार कार्यशाळेत आज केले. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिनादरम्यान ‘समता पर्व’ आयोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत पत्रकार बांधवांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावरील कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झाली. समाजकल्याण उपायुक्त   सुनील वारे अध्यक्षस्थानी होते. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर,                     डॉ. राजकुमार दासरवाड आदी उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागातर्फे वंचित घटक

डाक अदालत 13 डिसेंबरला तक्रारींचा तपशील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

  डाक अदालत 13 डिसेंबरला तक्रारींचा तपशील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत डाक अदालतीचे आयोजन 13 डिसेंबर रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे.   विभागातील पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर अशा तस्सम तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक डाक घर अमरावती विभाग, अमरावती 444602 यांच्याकडे सादर करावा. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करुन उद्या मंगळवार    दि. 29 नोव्हेंबरपर्यंत पाठवावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे. 00000

रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे

  रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे अमरावती, दि. 28 (जिमाका) : रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा कालवा निरीक्षक अथवा मोजणीदार यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन अमरावती मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पां. आडे यांनी केले आहे.   अमरावती मध्यम प्रकल्प विभागातील उपलब्ध पाणी पुरवठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नमुना 7 दोन प्रतीमध्ये विहित कालावधीमध्ये सादर करावा. पाणी मागणी अर्जाचे कोरे नमुने संबंधित उपविभाग शाखा कार्यालय व उपशाखा कार्यालयातून मोफत पुरविण्यात येत आहेत.   शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेती पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरविण्याचे नियोजन आहे. उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे व सुक्ष्म सिंचना

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’ समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधानदिन ते महापरिनिर्वाणदिनादरम्यान साजरे होणार ‘समता पर्व’ समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन अमरावती दि. 25: जिल्ह्यात संविधानदिन (दि. 26 नोव्हेंबर) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (दि. 6 डिसेंबर) दरम्यान समता पर्व साजरे करण्यात येणार असून, त्यात समाजकल्याण कार्यालयातर्फे रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.   संविधानदिनी दि. 26 नोव्हेंबरला सामाजिक न्यायभवनात, तसेच सर्व कार्यालये, शाळा-महाविद्यालयात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. त्या म्हणाल्या की, संविधानदिनी प्रभात फेरीही काढण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करुन प्रभात फेरी इर्विन चौक ते पंचवटी येथे जाऊन डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकास अभिवादन करुन सामाजिक न्याय भवनापर्यंत जाईल.   त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, तसेच डॉ. राजेश मिरगे यांचे संविधान जागृती या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत जिल्हा जात प

संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

  संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन                        अमरावती, दि. 25 - भारतीय संविधानाबाबत जनजागृतीसाठी संविधान दिनानिमित्त शनिवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व कार्यालये व शाळा-महाविद्यालयांत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. संविधानदिनानिमित्त समाजकल्याण आयुक्तालय व जिल्हा प्रशासनातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. संविधानबाबत जनजागृती व्हावी यासाठी शाळा व संस्थांनी संविधान यात्रा काढावी. संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये, जबाबदा-या आदी महत्वाची कलमे ठळकरित्या फलकांद्वारे प्रदर्शित करावेत. निबंध, भित्तीपत्रके, मूलभूत तत्वांवर चर्चा, व

क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’

  क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’ अमरावती, दि. 25 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम देशभर सुरु केला आहे. सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या उपक्रमाबाबत जनजागृती होण्यासाठी क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळून देण्यात येत आहे. क्षयरुग्णांना मदत म्हणून ‘निक्षय मित्र नोंदणी’ करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले आहे.             प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत देशातून क्षयरोग दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. समाजातील विविध घटक जसे दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, इतर कार्यालय व संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय संस्था अशा नोंदणी केलेल्या निक्षय मित्रांमार्फत आवश्यकतेनुसार क्षयरुग्णांच्या पोषक आहारात सहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपचार मिळणाऱ्या क्षयरुग्णांना ‘निक्षय मित्र

नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक नामांकन कार्यक्रम

  नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक नामांकन कार्यक्रम         अमरावती, दि. 24 : नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय केंद्र शासनाव्दारे तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्वयंसेवक नामांकन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शैलेश शेकापूरे, प्रमुख मार्गदर्शक सुबोध धुरंदर, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यावेळी उपस्थित होत्या.   युवकांना राष्ट्र निर्माण प्रक्रियेत भाग घेण्याची संधी स्वयंसेवक नामांकन कार्यक्रमामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच त्यांचे व्यक्तित्व   आणि कौशल्य विकसित करण्यात येणार आहे. स्वयंसेवक म्हणून नामांकन करण्यासाठी स्वयंसेवकाचे वय वर्षे   15-29 या वयोगटातील हवे. तसेच तो नेहरू युवा केंद्राच्या कुठल्याही युवा मंडळाचा सदस्य नसावा. याशिवाय तो कुठल्याही बेकायशीर कामात आरोपी असू नये, असे श्रीमती बासुतकर यांनी कळविले. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून युवकांना संगीत, नृत्य, खेळ, चित्रकला आदी कला जोपासण्याची संधी दिली जाईल. नेहरू युवा केंद्राव्दारे आयोजित केले जाणारे जिल्हा, राज्य आणि

आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

  आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत अमरावती, दि. 24 (जिमाका) : आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत शासनाव्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेसाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील हवा. उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण तसेच दि. 15 मार्च 2023 रोजी 30 वर्ष पूर्ण केलेले असावे. उमेदवार किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. सद्यस्थितीत तो कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. इच्छुक उमेदवारांनी दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल

ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल

Image
  ग्रंथोत्सवात रंगली काव्य मैफल अमरावती, दि. 23 (जिमाका) :   वाचन संस्कृती वृध्दिंगत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर अमरावती शासकीय विभागीय ग्रंथालय येथे नुकतेच ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रंथदिंडीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, विविध विषयांवर परिसंवाद, एकपात्री प्रयोग तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या विविधरंगी कार्यक्रमांना वाचक, लेखक, ग्रंथप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ या उक्तीनुसार कवी संमेलनामध्ये कवींनी बहारदार काव्य सादर केले. प्रतिभाशाली काव्यातून कवि संमेलनाची मैफल रंगली. करुण, वीर, हास्य अशा नऊही रसांनीयुक्त कवितांचे सादरीकरण करुन कवींनी त्यांच्या भावना उलगडल्यात. कवी संमेलनाचे अध्यक्ष राज यावलीकर यांनी वऱ्हाडी थाटात कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनाचे हुबेहुब वर्णन त्यांनी काव्यातून मांडले. विष्णू सोळंके यांनी देशभक्तीपर रोमहर्षक गीत सादर केले. अनंत नांदूरकर यांचे मराठीसह हिंदी आणि ऊर्दू भाषेतून बहारदार गजल सादर केल्या. संघमित्रा खंडारे यांनी ‘माऊ

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

Image
  जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद अमरावती, दि. २१ : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचनाविज्ञान केंद्राला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे कामकाज, यंत्रणेचे स्वरूप व जबाबदारी आदी विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. ०००

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती

Image
  परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती अमरावती, दि. २१ : जागतिक अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी शहरात आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यात ५० परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेतला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला जातो. यावेळी प्रादेशिक  परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी, सहायक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके, निरीक्षक वैभव गुल्हाने यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शहरातील इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक अशा प्रमुख ठिकाणांना रॅलीने भेट देत रस्ता विषयक  सुरक्षितता व दक्षतेबाबत जनजागृती करण्यात आली.  रॅलीने टोलनाक्यांनाही भेट देऊन रस्ता सुरक्षितता नियमांची पत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली. रॅलीत परिवहन विभागाचे ५० अधिकारी व कर्मचारी बाईकवर हेल्मेटसह सहभागी झाले होते. नांदगावपेठ टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम झाला. त्यात विविध वाहनचालक, एसटी महामंडळ कर्मचारी व प्रवासी अशा सुमारे दीडशे व्यक्

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर

Image
  आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर   अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी  संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय निश्चिती आणि

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती

Image
  दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ वाचन संस्कृती रुजविणाऱ्या पोस्टरांच्या माध्यमातून जनजागृती          अमरावती, दि. १८ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याव्दारे दि. १८ व १९ नोव्हेंबरला आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीने आज (दि. 18 नोव्हेंबर) झाला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे, सहायक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांचेसह विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते विभागीय ग्रंथालय कार्यालयापर्यंत ग्रंथ व पुस्तकाने सजलेल्या देखन्या पालखीसह ग्रंथदिंडीचे मार्गक्रमण झाले. या ग्रंथदिंडीत जिल्हा परिषद शासकीय मुलींची शाळेच्या विद्यार्थींनींनी मंगेश पाडगावकर लिखीत ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ आमचे साथी ! ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती ! जयाला नसे आवड वाचनाची, कसा गोडी चाखील तो ज

अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित - खासदार डॉ. अनिल बोंडे

Image
  अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित - खासदार डॉ. अनिल बोंडे   अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला. अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी पवनीत कौर  यांच्या उपस्थितीत झाला. ग्रंथोत्सवानिमित्त शहरातून उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, तहसीलदार संतोष काकडे तसेच ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक यावेळी उपस्थित होते.  खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी,  ‘ग्रंथोत्सव’ घेतला जातो. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होते. ग्रंथांचे महत्त्व समाजमाध्यमांच्या युगातही अबाधित असल्याचे खासदार डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी  शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन          अमरावती, दि. 17 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हंगाम 2022-23 मध्ये मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी खरेदी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मूग 7 हजार 755 रूपये, उडीद 6 हजार 600 रूपये व सोयाबीन 4 हजार 300 रूपये प्रती क्विंटल भाव शासनाने निश्चित केले आहेत.         नोंदणीसाठी हंगाम 2022-23 मधील पीक पेरा नोंद असलेल्या तलाठ्याचे सही, शिक्क्यानिशी ऑनलाइन सात-बारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट नमुद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट व नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नेरपिंगळाई मार्फत नोंदणी सुरू आहे.        वरील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडी

‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा   -         जिल्हाधिकारी पवनीत कौर        अमरावती, दि. 17 : ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा, तालुका तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव ‘बालविवाहमुक्त गाव’ म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.             जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.              बालविवाहमुक्त जिल्हा अभियान राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये

विधी सेवा प्राधिकरणामार्फत रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

विधी सेवा प्राधिकरणामार्फत  रविवारी नियोजनभवनात महाशिबिर   अमरावती, दि. 9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘विधी सेवा महाशिबिर’  रविवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित असतील. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर अध्यक्षस्थानी असतील.             ‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाव्दारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि हक हमारा भी तो है 75’ या विषयावर हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शोएब  खान यांनी केले आहे. 00000