Posts

Showing posts from January, 2018
Image
महालक्ष्मी मंदिर परिसराच्या  80  कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई ,  दि.  31 :  कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे  80  कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या तीनही वाहनतळावर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली. येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीस महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ,  गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर ,  नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील ,  खासदार धनंजय महाडिक ,  आमदार अमल महाडीक ,  राजेश क्षीरसागर ,  माजी मंत्री आमदार सतेज पाटील ,  महापौर स्वाती येवलुजे ,  मुख्य सचिव सुमित मलिक , सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह ,  जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार ,  महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी ,  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अ
Image
दिलखुलास कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे            मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास   कार्यक्रमात  ‘ बीड जिल्ह्याचा विकास ’   या विषयावर ग्रामविकास ,  महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.              ही मुलाखत गुरुवार दि. 1 आणि  शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी   आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून   सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.   निवेदिका रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी ही मुलाखत घेतली आहे. बीड जिल्ह्यातील रेल्वे विकास ,  जलसंधारण प्रकल्प ,  रस्ते विकास ,  पर्यटन विकास ,  जिल्ह्यात राबविण्यात येणारे स्वच्छ भारत अभियान ,  तीर्थक्षेत्र तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत श्रीमती मुंडे यांनी  ‘ दिलखुलास ’  कार्यक्रमातून माहिती दिली आहे. ००००
Image
दुर्जनांवर मात करण्यासाठी सज्जनांनी संघटीत व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दि. 31: समाजातील सज्जन शक्ती संघटीत झाल्यासच दुर्जन शक्तींवर सहज मात करता येते आणि सकारात्मक बदल घडतो. म्हणून सज्जन शक्तींनी संघटीत व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथ केले.             येथील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात अनुलोम लोकराज्य अभियान (अनुलोम) पुणे विभागाच्यावतीने आयोजित सारथ्य समाजाच्या विकास मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले ,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे ,  पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक ,  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह ,  अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी ,  विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी ,  अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे ,  सारंगधर निर्मल ,  हर्षल मोर्डे ,  मयुर राजे उपस्थित होते.            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ,  लोकशाहीच्या यंत्रणेला चालविण्यासाठी समाजातील लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही. समाजातील सकारात्मक
चिंतामण वनगा यांना   मुख्यमं त्र्यांकडून श्रद्धांजली मुंबई ,  दि .  30  :   पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि सम र्पि त नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली  आहे. मुख्यमंत्री   आपल्या   शोकसंदेशात   म्हणतात ,  वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते.  विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
Image
भाषा ,  संस्कृती ,  सण वेगवेगळे तरी भारतीय म्हणून आपण एकसंघ -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 29 : भाषा ,  संस्कृती ,  सण वेगवेगळे असले तरी आपण भारतीय म्हणून एकमेकांवर प्रेम करतो ही आपली एकसंघ राहण्याची ताकद आहे ,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. षण्मुखानंद येथे आयोजित तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  कार्यक्रमास आमदार कॅप्टन आर. तमिळसेलव्हन , आमदार आशीष शेलार ,  जयराज साळगावकर ,  अभिनेत्री श्रुती डांगे ,  आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की ,  गेल्या अनेक वर्षांपासून तमिळ बांधव महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने इथे राहत असून त्यांनी आपली संस्कृती जपली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रालाही आपले केले आहे. तमिळ भाषा प्राचीन असून आजही या भाषेने आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवत आपल्या सर्वांना समृद्ध केले आहे. तमिळ भाषा ही एक पुरातन भाषा आहे. थिरुकुरल साहित्याचे माहात्म्य जगाने मान्य केले आहे. या संस्कृतीचा एक इतिहास आहे. आज तामिळने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला रजनीकांत सारखा सुप
Image
स्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल                             आर्थिक सर्वेक्षण पाहणीतील निष्कर्ष        नवी   दिल्ली ,  29   :   वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशाच्या एकूण वस्तू व सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा  22.3  टक्के इतका आहे. देशाचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल  2017- 2018  आज प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशातील महाराष्ट्र  , गुजरात ,  कर्नाटक ,  तामिळनाडू , तेलंगणा ही पाच राज्य अग्रेसर ठरली आहेत. या पाच राज्यांचा वाटा देशाच्या एकूण निर्यातीपैकी  70.1  टक्के इतका आहे. या पाच राज्यांपैकी महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे  22.3  टक्के इतका आहे. गुजरात राज्य  17.2  टक्के निर्यातीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक  12.7, तिसऱ्या स्थानावर ,  तामिळनाडू  11.5  टक्क्यासह     चौथ्या तर तेलंगणा  6.4  टक्के निर्यातीसह पाचव्या स्थानावर राहिले आहे.   आंतरराज्य व्यापारात महाराष्ट्र प्रथम देशातील राज्यांतर्गत व्यापारात महाराष्ट्र , गुजरात ,  हरियाणा ,  ओडिशा आणि तामीळनाडू ही राज्
Image
विज्ञान शाखेच्या आदिवासी मुला-मुलींना पॅरामेडिकल कोर्स शिकविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ·          आदिवासी भागातील सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाने विशेष योजना तयार करावी ·          गडचिरोली जिल्ह्यात अडीच लाख मच्छरदाण्यांच्या वाटपामुळे मलेरियाने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट ·          नागपूर येथे प्लाझ्मा सेंटर तातडीने सुरु करावे ·          वैद्यकीय कौशल्य विकास अभ्यासक्रम राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातून सुरु करावा मुंबई, दि. 29 : विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आदिवासी मुला-मुलींना पॅरामेडिकल कोर्सचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून आदिवासी भागात आरोग्याबाबत जनजागृती, समुपदेशन करण्यात येईल. आदिवासी भागातील सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाने विशेष योजना तयार करावी. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत अडीच लाख मच्छरदाण्यांचे वाटप झाल्याने या भागातील मलेरियाने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांग
Image
शेतकरी सन्मान योजनेसाठी एक लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी शेतकरी सन्मान योजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केला. रामगिरी येथे अल्ताफ हमीद यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले , आमदार परिणय फुके , आमदार विजय रहांगडाळे , आमदार संजय पुराम , विरेंद्र अंजनकर , हेमंत पटले , प्रमोद संगीडकर आदी उपस्थित होते. ००००
Image
मोर्णा स्वच्छता मोहिमेची मा . पंतप्रधानांनी घेतली दखल ‘ मन की बात ’ मध्ये मोर्णा स्वच्छता मोहिमेचे केले कौतुक एकजुटीने अकोलेकरांनी मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय     --- पंतप्रधान नरेंद्र मोदी   अकोला, दि. 28     जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची आज स्वत : मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखली घेतली . आपल्या ‘ मन की बात ’ या कार्यक्रमातून त्यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले . एखादे चांगले काम करण्याचा ठाम निश्चय केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही , या भावनेतूनच अकोल्याच्या लोकांनी एकजुटीने मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे , याबददल मी अकोल्याच्या जनतेचे , तेथील प्रशासनाचे अभिनंदन करतो , आपला हा उपक्रम देशातील इतर लोकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल , या शब्दांत पंतप्रधानांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले . दूरदर्शन , आकाशवाणी आणि इतर प्रसार माध्यमांवरुन मा . पंतप्रधान यांचा ‘ मन की बात ’ हा कार्यक्रम प्रसारीत होत असतो . आज रविवारी प्रसारीत झालेल्या त्यांच्या या कार