माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एचसीएलच्या
प्रकल्पामुळे मिहानचे भविष्य बदलेल
- देवेंद्र फडणवीस

* एचसीएलच्या अत्याधुनिक कॅम्पसचे उद्घाटन
* स्थानिक 2 हजार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभावंतांना नोकऱ्या
* पहिल्या प्रशिक्षण घेतलेल्या बॅचचा सहभाग
* टॅलेन्ट हब म्हणून नागपूरची नवी ओळख
नागपूरदि. 15 :  माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन आणि बदलामुळे नवीन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन युवकांनी आपल्या करिअरची सुरुवात करावी. एचसीएलसारख्या जागतिक स्तरावरील प्रकल्पामुळे स्थानिक प्रशिक्षित युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगराच्या संधी उपलब्ध होत असून हा प्रकल्प मिहानचे भविष्य बदलंवेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मिहान येथील जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजी कॅम्पसचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते तर एचसीएल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहापौर नंदाताई जिचकारजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकरआमदार समीर मेघेएचसीएलचे उपाध्यक्ष सी. विजय कुमार आदी उपस्थित होते.
जागतिक स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीजने मिहानमध्ये 50 एकर जागा घेवून एचसीएल कॅम्पसची सुरुवात केली. वर्षभरात स्थानिक प्रतिभावंत युवकांना प्रशिक्षित करुन प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीस्थानिक प्रतिभावंत युवकांना प्रशिक्षण देवून त्यांना नियुक्ती देण्याचे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. नागपूरसह विदर्भातील  2000 युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नागपूरचे हे केंद्र भारतातीलच नव्हेतर जगातील प्रगत केंद्र म्हणून ओळखले जाईल.
जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या  एचसीएल टेक्नॉलॉजीमुळे मिहानचे भविष्य बदलेल व त्यासोबत मिहानमुळे एचसीएलचे भविष्य बदलणार असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले कीनागपूर येथील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यात आल्यामुळे येथे येणारा प्रत्येक व्यक्ती शहराच्या प्रेमात पडतो. एचसीएलला विस्तारासाठी शासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून येथे आयटी टाऊनशीप लवकरच विकसित करण्यात येणार असून एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले कीनागपूरसह  विदर्भाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणाऱ्या उद्योग सुरु होण्याची आवश्यकता आहे. मिहान तसेच ड्रायपोर्टच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत 50 हजारपेक्षा जास्त तरुणांना रोजगार निर्माण करण्याचे धोरण असून आयटी क्षेत्रातील नामवंत एचसीएल प्रकल्पामुळे आयटी क्षेत्रातील स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे.
आयटी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणारी मोठी युवा पिढी नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एचसीएल कंपनीने दुसरा टप्पा  सुद्धा लवकरच सुरु करावा यासाठी राज्य व केंद्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येणार असून येथील तरुण अभियंत्यांना चांगल्या संधी मिळण्यासाठी कुठलीही अडचण जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक तरुणांच्या कौशल्याला वाव देवून त्यांना रोजगार दिल्याबद्दल एचसीएलचे यावेळी त्यांनी अभिनंदने केले.
एचसीएल केंद्रातर्गत इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटअप्लिकेशन डेव्हलेपमेंटप्रॉडक्ट  इंजिनिअरिंगबीपीओआयसी सर्व्हिसेस मॅनेजमेंट आणि एचसीएल अंतर्गत कार्यक्षमता अनेक सेवा या केंद्रामार्फत प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रारंभी एचसीएलचे अध्‍यक्ष पद्मभूषण शिव नाडर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत केले. तसेच एचसीएल कॅम्पसमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कॅम्पसमध्ये विविध सुविधांची पाहणी केली. नागपूरच्या रायसोनी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच्या शिक्षण पूर्ण केलेल्या कु. रुची  विघ्ने या तरुणीसोबत संवाद साधला. येथील प्रशिक्षित 200 युवा स्थानिक अभियंत्यांशी पहिली बॅच या प्रकल्पाच्या सेवेत दाखल झाली आहे. जागतिक स्तरावरील आयटी क्षेत्रातील सुविधा येथे सुरु झाल्या आहेत.
प्रारंभी एचसीएल टेक्नॉलॉजीचे कार्यकारी उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी प्रास्ताविकात एचसीएल नागपूर केंद्राबद्दल माहिती दिली. नागपूरला आयटीच्या जागतिक नकाशावर आणण्याचे ध्येय असून येथील युवकांमध्ये कौशल्य वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी पदवीधारांना संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वागत एचसीएल टेक्नॉलॉजीचे वित्त अधिकारी अनिल चनाना यांनी तर आभार वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी मानले. यावेळी मिहानचे वरिष्ठ अधिकारीलोकप्रतिनिधीआयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती