भाषासंस्कृतीसण वेगवेगळे तरी भारतीय म्हणून आपण एकसंघ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 29 : भाषासंस्कृतीसण वेगवेगळे असले तरी आपण भारतीय म्हणून एकमेकांवर प्रेम करतो ही आपली एकसंघ राहण्याची ताकद आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
षण्मुखानंद येथे आयोजित तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
 कार्यक्रमास आमदार कॅप्टन आर. तमिळसेलव्हन,आमदार आशीष शेलारजयराज साळगावकरअभिनेत्री श्रुती डांगेआदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगेल्या अनेक वर्षांपासून तमिळ बांधव महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने इथे राहत असून त्यांनी आपली संस्कृती जपली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रालाही आपले केले आहे. तमिळ भाषा प्राचीन असून आजही या भाषेने आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवत आपल्या सर्वांना समृद्ध केले आहे.
तमिळ भाषा ही एक पुरातन भाषा आहे. थिरुकुरल साहित्याचे माहात्म्य जगाने मान्य केले आहे. या संस्कृतीचा एक इतिहास आहे. आज तामिळने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला रजनीकांत सारखा सुपरस्टार अभिनेता दिला आहे. भाषासंस्कृतीसण वेगवेगळे असले तरी आपण भारतीय म्हणून एकमेकांवर प्रेम करतो ही आपली एकसंघ राहण्याची ताकद आहे. तामिळकरांच्या या पोंगलच्या निमित्ताने आपली भारतीय संस्कृती अशीच पुढे जावो अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
कार्यक्रमास मुंबई व परिसरातील तमिळ बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती