Tuesday, January 9, 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात प्रा. राम शिंदे

            मुंबई. दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात ओबीसी मंत्रालयाची रचना आणि कार्यपद्धती या विषयावर मृद वजलसंधारण,राजशिष्टाचार तथा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांची  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून  बुधवार दि. 10 आणि गुरुवार दि.11 जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी  ही मुलाखत घेतली आहे.
            ओबीसी मंत्रालयाची रचना आणि कार्यपद्धती, ओ.बी.सी. मंत्रालयाच्या माध्यमातून  राबविण्यात येणा-या विकास योजना, विविध महामंडळाच्या कामकाजाचा समन्वय, ओबीसी मंत्रालयाच्या सबलीकरणाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात आदी विषयांची माहिती  श्री. शिंदे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...