हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची मंत्रालयास भेट
राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबईदि. 8 अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या (युनायटेड स्टेट) हार्वर्ड केनेडी स्कूल आणि हार्वर्ड बिझीनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना राज्यात सुरू असलेल्या विविध सोयी-सुविधांबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले कीमंत्रालयातील वॉररूममधून राज्यातील विकासाबाबत महत्वाच्या बैठका होऊन त्यातून होणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयांची राज्यभर अंमलबजावणी केली जाते. हे सर्व काम कार्यपद्धतीनुसार चालते.
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र हे इतर राज्यापेक्षा वेगळे कसेअसा प्रश्न केला. मुख्यमंत्र्यांनी यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबतची माहिती दिली. गेल्या तीन वर्षात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी झाली आहे. शिवाय गुन्हे सिद्धताही वाढली आहे. एखाद्या प्रश्न व समस्येवर त्वरित निर्णय घेण्यात येतो. राज्य सरकारने यासाठी आपले सरकार’ हे वेबपोर्टल आणले आहे. मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावीया उद्देशाने हे पोर्टल तयार केले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही योजना इतर राज्यापेक्षा वेगळी असून याची देशपातळीवर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणालेदेशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. सरकारचा सर्वात जास्त भर कृषी  व शिक्षण क्षेत्रावर आहे. शेतकऱ्यांना शाश्वत शेती व हमीभाव मिळण्यासाठी सरकारचा भर राहिला आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानमागेल त्याला शेततळे या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.
मुंबईत सर्वात मोठे विमानतळ असल्याने दळणवळण सहज होते. शिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यात विमानतळ होणार आहेत. यामुळे जगाशी संपर्क वाढला आहे. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी सोयी-सुविधा असल्याने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही यायला लागले आहेत. मुंबईनागपूर आणि पुणे या  मोठ्या शहरात मेट्रोचे जाळे निर्माण होऊ लागले आहे. शिवाय पाच हजार किमीचे राष्ट्रीय महामार्गांचे कामही प्रगतीपथावर आहे. शिवाय इज ऑफ डुईंग बिजनेसमध्ये मुंबईने सुरू केलेल्या कामांचा मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील शिक्षण पद्धतीमध्येही बदल करण्यात येत आहेत. यामध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा समावेश आहे. प्राथमिकसाठी तीन ग्रेड केले आहेत. याची अंमलबजावणी 50 हजार शाळांमध्ये होत आहे. याचबरोबर शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढीवरही शासनाचा भर आहे. विद्यापीठस्तरावर कन्हेंन्शन कोर्सेसवर भर दिला आहे. 
विद्यार्थ्यांमध्ये 12 देशातील प्रतिनिधींचा समावेश होता. ते राजकीयव्यावसायिक आणि सांस्कृतिक घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले आहेत. त्यांनी मुंबई शहराला भेट देऊन माहिती घेतली. इथली सुरू असलेली कामे पाहून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली.  यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.
००००


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती