Wednesday, January 24, 2018

राज्य सरकारसोबत काम करण्याची कोकाकोलाची तयारी
 मॅग्नेटिक महाराष्ट्रातील सहभागासाठी
जागतिक उद्योग समूह उत्सुक- मुख्यमंत्री

मुंबईदि. 24दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने दाखविली आहे.
या परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये आज कोकाकोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जेम्स क्विन्सी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी श्री. क्विन्सी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत कोकाकोला समुहाने राज्य सरकारसोबत विविध क्षेत्रात सहयोग देण्याचे मान्य केले. तसेच भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर नेण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत केपीएमजी या संस्थेसोबत विचारविमर्श करण्यात आला. त्यामध्ये नवीन अर्थरचनेत रोजगार निर्मिती, ऑटोमेशन आणि पुन:कौशल्य या बाबींचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.    
            आज सकाळच्या सत्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमाची विविध जागतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. उद्योग उभारणीसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या विविध सोयी-सुविधांची माहिती देतानाच गेल्या तीन वर्षात उद्योगसुलभतेसाठी केलेल्या प्रयत्नांबाबतही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रयत्नांमुळे औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्तम केंद्र ठरल्याचे लक्षात आणून देतानाच मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘इझ ऑफ डुईंग बिझिनेस’ धोरणाविषयी दिलेल्या माहितीविषयी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. जीएसटीनिश्चलनीकरण या सर्व कठोर आर्थिक सुधारणांमधून चांगला संदेश गेला असून श्री. मोदी यांनीही नवीन विचार जगासमोर ठेवला आहे. भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा आला तर निर्माण होणारी मागणी ही भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेलाही पोषक ठरणार आहे. भारतातील श्रीमंत आणि गरीबांमधील दरी मिटविण्यासाठी होत असलेल्या आर्थिक समावेशकतेच्या प्रयत्नांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह स्टरलाईट, टाटा सन्स, व्होटाफोन, अपोलो टायर्स आदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांसह शाहरुख खान यांचा माध्यमांशी संवाद
            दावोस येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि अभिनेता शाहरूख खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण असल्याची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने मागील काही वर्षांमध्ये स्वत:ला विकसित केले असून ते आता देशाचे ग्रोथ इंजिन बनले आहे. मुंबईसह महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी योग्य ठिकाण असल्याची माहिती देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ही जागतिक गुंतवणूक परिषद मुंबईत होणार आहे. पायाभूत सुविधाउत्पादकता यामध्ये गुंतवणूक करण्यासह नवीन उपक्रम राबविण्यास उत्सुक आहोत. ‘फ‍िनटेक’च्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच ऑग्मेन्टेड रिॲलिटी तंत्राने केवळ मनोरंजनाचे नव्हे तर अनेक क्षेत्रांमध्ये बदल होत आहेतत्यावरही आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.
                     अभिनेते शाहरुख खान म्हणालेमहाराष्ट्र-मुंबईत येऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता कशी होऊ शकते याचे मी स्वत: एक उदाहरण आहे. महाराष्ट्रात येऊन यशस्वी झाल्यानेच मी आज दावोसमध्ये येऊ शकलो. त्यामुळे दावोसमध्ये महाराष्ट्राविषयी बोलण्याचा माझा हक्क आहे. माझ्या दोन माता आहेत. दिल्लीच्या भूमीत माझा जन्म झाला आणि महाराष्ट्राच्या भूमीने माझे पालनपोषण केले. मुख्यमंत्री फडणवीस हे नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या उमद्या नेतृत्वाखाली राज्याला डिजिटल युगासोबत नेताना त्यामध्ये बॉलिवूडही मागे राहू शकत नाही. मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारने केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमांत योगदान देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
            पावसाळ्यात मुंबईत भौगोलिकनैसर्गिक कारणांनी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणालेमहापालिकेच्या माध्यमातून पावसाळी पाण्याचा निचरा करणारी उदंचन केंद्र बनविण्यात आली असून येत्या दीड वर्षात आणखी कामे पूर्णत्वास जातील. त्यानंतर ही समस्या पूर्णपणे सुटेलअसा विश्वास आहे. महाराष्ट्राला एक‍ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राचा विकास दर 10 टक्के आहे. येत्या आठ वर्षांत 10 टक्के किंवा त्याहून अधिक दर कायम राहिला तर महाराष्ट्र ट्रिलियन अर्थव्यवस्था नक्कीच होईलत्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
-----000-----



No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...