विदर्भात गुंतवणुकीसाठी ‘ग्लोबल समिट’ संधी
- मुख्यमंत्री
‎* बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरर्स असोशियशनच्या श्री एम के गोयल सभागृहाचे उदघाटन
नागपूर, दि. 15 : मुंबई येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन 2018’ ग्लोबल समिट प्रथमच होत आहे. या समिटचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार आहे. सध्या राज्यात औद्योगिक वातावरण चांगले आहे. तेव्हा ग्लोबल समिट नागपूर - विदर्भात गुंतवणूक वाढविण्यासाठी चांगली संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरर्स असोशियशन (बीएमए)च्या सभागृहाचे उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, बीएमए अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव जीवन घिमे, कोषाध्यक्ष प्रशांत मेश्राम यावेळी उपस्थिती होते. बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरर्स असोशियशन च्या श्री एम के गोयल सभागृहाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. हे सभागृह गोयल परिवाराने बांधून दिले आहे. या कार्यक्रमात असोशियशनच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर मेट्रो बुटीबोरी एमआयडीसी पर्यत आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. बुटीबोरी उड्डाण पूल ना. गडकरी यांच्या सहकार्याने करणार आहे, त्या बाबत निर्णय झाला आहे. बुटीबोरी येथील एमआयडीसी परिसरात कन्व्हेंशन सेंटर तयार करावे अशी मागणी असोशियशननी आपल्या निवेदनात केली होती. यावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर येथे जागतिक दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठी 250 एकर जागा लागणार असून योग्य जागेचा शोध सुरू आहे. जागा प्राप्त होताच कन्व्हेंशन सेंटर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल.
विजेचे दर कमी करण्यासंदर्भात असोसिएशनने विनंती केली असता मुख्यमंत्री म्हणाले की, विजेचे दर 2025 पर्यंत स्थिर ठेवण्यासाठी वीज विभागाला प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात 220 केव्हीचे विद्युत उपकेंद्र उभारण्याबाबत उर्जामत्र्यांनी समंती दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामपंचायत कराबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामपंचायत कर कायद्यात बदल करण्यात येत असून नवीन कायदा सर्वसमावेशक असेल.
मुंबईत होणाऱ्या ग्लोबल समीट मध्ये विदर्भ नागपूर साठी एक पॅव्हीलीयन राखून ठेवण्यात आले आहे या माध्यमातून विदर्भात गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या समिटमध्ये विदर्भातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरर्स असोशियशनच्या पदाधिकाऱ्यांनी या समिटचे मोठ्या प्रमाणात मार्केटींग करावे, असेही ते म्हणाले.
बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरर्स असोशियशनच्यावतीने तयार करण्यात आलेल्या टेलिफोन डिरेक्टरीचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. असोशियशनच्या सभागृहासाठी गोयल परिवाराने सहकार्य केल्यामुळे वर्षा गोयल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मिलिंद कानडे यांनी केले. यावेळी बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरर्स असोशियशनचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती