Saturday, January 20, 2018

अर्थसंकल्प महाराष्ट्राचा-जनतेच्या सहभागाचा
नागरिकांनी सूचना पाठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईदि. 20 : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग असावा या भूमिकेतून आगामी अर्थसंकल्पाविषयी (२०१८-१९) नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यातअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
शासनाच्या योजनांसह प्रशासकीय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख व विकासाभिमुख करतानाच धोरण निर्मितीत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळविण्यासाठी शासनामार्फत नागरिकस्वयंसेवी संस्थातज्ज्ञ व्यक्तींकडून वेळोवेळी सूचना मागविण्यात येतात. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या उचित सूचना-अपेक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्‍याच्‍या महसुली उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ करणेखर्चाची बचत करणे यासह अस्तित्त्वात असलेल्या योजना,यंत्रणाप्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना सूचना करता येतील. त्याचप्रमाणे नवीन योजनायंत्रणा आणि प्रक्रिया निर्माण करण्यासाठी देखील आपले अभिप्राय देता येतील. नागरिकांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्‍या सूचना पाठवाव्यात.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...