मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती
मुख्यमंत्रीरेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत विविध रेल्वे प्रकल्पांचा आढावा

मुंबईदि. 12 - एमयुटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात येणाऱ्या विविध रेल्वे प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सुचविलेल्या विविध प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेऊन ती कामे सुरू केली जातीलअशी ग्वाही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

हार्बर बोरीवलीपर्यंतविविध स्थानकाचे होणार आधुनिकीकरण

सीएसएमटी - पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणेपनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणेहार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत  वाढविणेइतर काही रेल्वे मार्ग वाढविणे अशा विविध प्रकल्पांची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच लोअर परेलखार रोडगोरेगावमीरा रोडविरारघटकोपरडोंबिवली,  नालासोपाराभाईंदरमुलुंडडोंबिवलीभांडुपवडाळा रोडसायनजिटीबी नगरचेंबूरशाहाड आदी विविध रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात यावेअशी विनंतीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या सर्व प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मान्यता देऊन हे सर्व प्रकल्प सुरू केले जातीलअसे रेल्वे मंत्री श्री. गोयल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणालेकेंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून मुंबईत रेल्वेची विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. एकीकडे मेट्रो आणि दुसरीकडे रेल्वेचे नवीन प्रकल्प यांच्या माध्यमातून भविष्यात सामान्य मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकारक होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वे मंत्रालयाकडे या सर्व प्रकल्पांबाबत पाठपुरावा करणे तसेच या प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडील निर्णय घेण्याचे दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुंबइत रेल्वेचे जाळे विकसित करताना रेल्वेएमएमआरडीएसिडकोमहापालिका अशा विविध संस्थानी समन्वयाने काम करावेअशा सूचना यावेळी रेल्वे मंत्री श्री. गोयल यांनी दिल्या.
बैठकीस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानीरेल्वे बोर्डाचे सदस्य अभियंता एम. के. गुप्तामध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मापश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ताआमदार आशिष शेलारराज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री अजोय मेहतायु.पी.एस. मदानप्रवीण परदेशीभूषण गगरानी,मनोज सौनिकसंजयकुमार आदी उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती