स्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल
                          आर्थिक सर्वेक्षण पाहणीतील निष्कर्ष      

नवी दिल्ली, 29 :  वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशाच्या एकूण वस्तू व सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 22.3 टक्के इतका आहे.

देशाचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2017- 2018 आज प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशातील महाराष्ट्र ,गुजरातकर्नाटकतामिळनाडू,तेलंगणा ही पाच राज्य अग्रेसर ठरली आहेत. या पाच राज्यांचा वाटा देशाच्या एकूण निर्यातीपैकी 70.1 टक्के इतका आहे. या पाच राज्यांपैकी महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 22.3 टक्के इतका आहे. गुजरात राज्य 17.2 टक्के निर्यातीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 12.7,तिसऱ्या स्थानावरतामिळनाडू 11.5 टक्क्यासह  चौथ्या तर तेलंगणा 6.4 टक्के निर्यातीसह पाचव्या स्थानावर राहिले आहे. 
आंतरराज्य व्यापारात महाराष्ट्र प्रथम
देशातील राज्यांतर्गत व्यापारात महाराष्ट्र,गुजरातहरियाणाओडिशा आणि तामीळनाडू ही राज्य अग्रेसर ठरली आहेत. महाराष्ट्र आंतरराज्य व्यापारात 15.7 टक्के निर्यात तर 13.7 टक्के आयातीसह अव्वल ठरले आहे. 
  जीएसटी नोंदणीत महाराष्ट्र टॉप राज्यात

वस्तू व सेवा कर नोंदणीमध्ये देशातील महाराष्ट्रउत्तर प्रदेश ,तामीळनाडू ही चार राज्य अग्रेसर ठरली आहेत. 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती