Posts

Showing posts from September, 2022

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

Image
  सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव   अमरावती दि.30 (विमाका) :   जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांच्या हस्ते आज करण्यात आला. साईनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनां

नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी ध्वनीक्षेपक वापराबाबत सवलत

  नवरात्रौत्सवानिमित्त शनिवारी ध्वनीक्षेपक वापराबाबत सवलत               अमरावती, दि. 30 : नवरात्रौनिमित्त शनिवारी (1 ऑक्टोबर) ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजतापर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.   तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी पवनीत कौर यांच्या मान्यतेने अप्पर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी आज जारी केला. ही सवलत राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात लागू होणार नाही व ध्वनीमर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. आदेशानुसार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरासाठी सवलत देण्यात आली आहे.   अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी ध्वनी प्राधिकरण, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. वर्षातील 14 दिवसांसाठी अशा प्रकारची सवलत यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती.  

किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियांबद्दल डॉक्टर व कर्मचा-यांचा गौरव

Image
  किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियांबद्दल डॉक्टर व कर्मचा-यांचा गौरव ‘सुपर स्पेशालिटी’तील यंत्रणेचे कार्य कौतुकास्पद -   विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे                अमरावती, दि. 30 (विमाका) : किडनी प्रत्यारोपण शस्त्रकियेसाठी बाहेरील यंत्रणेवर अवलंबून न राहता अमरावतीतच स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने सुसज्ज यंत्रणा विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात निर्माण झाली आहे. हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे काढले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे आतापर्यंत किडनी प्रत्यारोपणाच्या 15 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यातील पंधरावी शस्त्रक्रिया बाहेरील टीमची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने यशस्वी झाली. याबद्दल रुग्णालयातील डॉक्टर, स्थानिक तज्ज्ञ, पारिचारिका, परिचर व सर्व कर्मचा-यांचा गौरव विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, वैद्यकीय अधिक्षक अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. राहुल पोटोडे, डॉ. राहुल घुले, डॉ. विक्रम देश

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

  विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे अमरावती दि.30 (विमाका) :    अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणको भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय, निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र 2022-23 या सत्राचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  https://mahaddimahat.gov.in  ही प्रणाली दिनांक 21  सप्टेंबर  पासुन कार्यान्वीत झाली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुचना आहेत. जिल्हातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनेचे सन 2022-23 या सत्रातील तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ  https://mahadbtmahait.gov.in    या ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात यावे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज मरुन महाविद्यालय स

आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

  आदिवासी शासकीय वसतीगृहाकरीता इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी ५ ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे अमरावती दि.30 (विमाका) :   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या अमरावती येथील आदिवासी मुले/मुलींचे शासकीय वसतीगृह, (विद्यार्थी क्षमता ५००, ३०० व २५० असलेले) विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता सर्व सोई-सुविधा असलेले म्हणजेच निवासी खोल्या, स्नानगृह, शौचालय उद्यालय, संगणक कक्ष व पाणी पुरठ्याची सोय इत्यादी असलेल्या स्वमालकीच्या इमारती माडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक इमारत मालकांकडून भाडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाडे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता.धारणी जि. अमरावती येथे दि. ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सादर करण्यात यावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कळविले आहे. ००००००

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

  विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे अमरावती दि.30 (विमाका) :   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतात. या योजनांचे अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास दि.२१ सप्टेंबर, २०२२ पासून महाडीबीटीपोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सुरु करण्यात आलेले आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विभागातील जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव

  सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा विभागीय आयुक्ताच्या हस्ते सामाजिक संस्थांचा गौरव   अमरावती दि.30 (विमाका) :   जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे  यांच्या हस्ते आज करण्यात आला. साईनगरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनां

नशामुक्ती भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम

Image
  नशामुक्ती भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम   अमरावती, दि.29: नशामुक्ती भारत अभियानांतर्गत समाज कल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील समाज कार्यमहाविद्यालय, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह यांच्या सहभागाने वक्तृत्व, निबंध लिखाण तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन यामार्फत जनजागृती करण्यात आली. शिक्षकवृंदांसह विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.  00000

सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील कार्यालयातर्फे विविध दाखल्यांचे वितरण

Image
  सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील  कार्यालयातर्फे विविध दाखल्यांचे वितरण     अमरावती, दि. 29 : सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील कार्यालयातर्फे प्रलंबित अर्जांचा गतीने निपटारा करत, विविध दाखले वितरणाचा कार्यक्रम वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे घेण्यात आला. अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.   शासनाच्या 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत  तहसील कार्यालय अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने 51 पात्र लाभार्थी यांना सातबारा वितरण,64 लाभार्थ्यांना रेशन कार्ड वितरण,संजय गांधी योजना /विशेष सहाय्य योजनेच्या 24 लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वितरण,महावितरण अंतर्गत नवीन वीज पुरवठा लाभार्थी तसेच नावात बदल करण्यात आलेल्या ग्राहकांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.   नायब तहसीलदार श्रीमती ठाकरे, निरीक्षण अधिकारी जितेंद्र पाटील,मंडळ अधिकारी राजेश दंडाळे,गावनेर,उगले, जोगी मॅडम,सांगळे मॅडम ,तलाठी पवन राठोड, बाहेकर,पाऊलझगडे मॅडम, भोंबे मॅडम,जाधव मॅडम,कपिले मॅडम व इतर तलाठी,कोतवाल उपस्थित होते. ०००

हेल्पलाईनच्या माध्यमातून सुविधा जेष्ठांच्या आधारासाठी 14567 टोल फ्री क्रमांक

  हेल्पलाईनच्या माध्यमातून सुविधा जेष्ठांच्या आधारासाठी 14567 टोल फ्री क्रमांक   अमरावती, दि.29 : सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकारमार्फत देशातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवरण्यासाठी सर्व राज्यात 14567 हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये जेष्ठांसाठी ही हेल्पलाईन चालविल्या जाणार आहे. या हेल्पलाईनचा उद्देश जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे असणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. हेल्पलाईन टोल फ्री क्र. 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरू असणार आहे. हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रिय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे. केली आहे. तरी हेल्पलाईनबाबत नागरिकांनी जेष्ठांना प्रोत

पदवीधर मतदार संघ निवडणूक सर्व कार्यालयांत कार्यरत पदवीधर कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

Image
  पदवीधर मतदार संघ निवडणूक सर्व कार्यालयांत कार्यरत पदवीधर कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे   अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. सर्व कार्यालयातील कार्यरत पदवीधरांनी मतदारांनी नोंदणी करुन घ्यावी. ती पूर्ण होण्यासाठी कार्यलय प्रमुखांना प्रयत्न करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.   पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत विविध कार्यालय प्रमुखांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.   विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार म्हणून शंभर टक्के नोंदणी करुन घ्यावी. शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार नोंदणीसाठीचा नमुना 18 विहीत शैक्षणिक पात्रता असल्याचा कागदोपत्री पुराव्य

उद्योग विभाग व ‘सिडबी’तर्फे गुंतवणूक व निर्यातीबाबत कार्यशाळा

Image
  उद्योग विभाग व ‘सिडबी’तर्फे गुंतवणूक व निर्यातीबाबत कार्यशाळा कार्यशाळेत दीडशे उद्योजकांचा सहभाग अमरावती, दि. 28 (जिमाका) : उद्योग व उद्यमशीलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ अधिकाधिक उद्योजक, व्यावसायिकांना मिळावा. विभागातून अधिकाधिक निर्यातक्षम उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.   उद्योग विभाग, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’(सिडबी) तर्फे अप्पर मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनात गुंतवणूक वृद्धी, निर्यात, व्यवसाय सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) आणि एक जिल्हा एक उत्पादन याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा अभियंता भवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उद्योग सह संचालक गजेंद्र भारती, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, निर्यातदार उद्योजक संजय जाधव, प्रकाश अहीरराव, कृषी सह संचालक किसनराव मुळे आदी उपस्थित होते. कार्यशाळे

पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

Image
  पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे   विभागीय आयुक्त कार्यालया माहिती अधिकार दिन साजरा   अमरावती, दि. 28 (जिमाका) :* माहिती अधिकार कायदा नागरिकांच्या हितासाठी आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामाकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने या कायद्याचे महत्त्व वादातीत असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.   विभागीय आयुक्त कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विषय तज्ज्ञ ॲड. राजेंद्र पांडे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.   माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे जागतिक माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो, असे सांगून डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, भारतीय संविधानाने माहितीच्या अधिकाराची निर्विवादपणे हमी दिली आहे. परंतु ही माहिती मिळविण्यासाठी व्य