मतदारांना आवाहन निवडणूक कार्ड आधारकार्डसोबत लिंक करण्यासाठी मतदान केंद्रावर रविवारी विशेष शिबिर

                                                                


                                                     


मतदारांना आवाहन

निवडणूक कार्ड आधारकार्डसोबत लिंक करण्यासाठी

मतदान केंद्रावर रविवारी विशेष शिबिर

       अमरावती, दि.06: अमरावती मतदार संघातील 314 मतदान केंद्रावर येत्या रविवारी, दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे उपस्थित राहून मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यास मदत करतील. तरी अमरावती विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपले आधारकार्ड आपल्या मतदान कार्डसोबत लिंक करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

मतदान कार्ड आधारकार्डसोबत निवडणूक आयोगाच्या VOTER HELP LINE APP या संकेतस्थळावर जाऊन लिंक करावे. Voter Helpline हे app या

https://play.google.com/store/apps/detaials?id=com.eci.citizen लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करावे. त्यानंतर  voter Registration ला क्लिक करुन फॉर्म 6 बी ला क्लिक करावे. Lets Start ला क्लिक करुन स्वत:चा  मोबाईल नंबर टाकावा. त्यावर आलेला ओटीपी टाकल्यावर Verify ला क्लिक करावे. Voter ID असेल तर Yes I Have Voter ID हे निवडा. Voter ID नंबर टाकून  राज्य महाराष्ट्र निवडा. व  नंतर प्रोसिडला क्लिक करा व तुमचा आधार नंबर टाकून Done व Confirm ला क्लिक करावे. शेवटी आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा संदेश येईल.

अमरावती विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले तसेच  सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संतोष काकडे यांनी मतदारांना शिबिराचा लाभ घेण्याबाबत कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती