Thursday, September 15, 2022

नेहरु युवा केंद्रातर्फे “स्वच्छता व आम्ही” बाबत चर्चासत्र

 नेहरु युवा केंद्रातर्फे स्वच्छता व आम्ही बाबत चर्चासत्र

अमरावती, दि.15 (जिमाका): नेहरु युवा केंद्र व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवड्यात ‘स्वच्छता आणि आम्ही’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

            मंडळाच्या सभागृहात आयोजित चर्चेला डॉ.अरुण खोडस्कर, प्रा. सुधीर पाटील, प्रा. विलास दलाल, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल  बासुतकर नेहरू  आदी मान्यवर उपस्थित होते.

मानवी जीवनात स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आरोग्याचे संवर्धन होण्याबरोबरच सौंदर्याचीही जोपासना होते असे डॉ. खोडस्कर यांनी सांगितले. प्रा.पाटील व प्रा.दलाल यांचीही भाषणे झालीत. स्वच्छतेचे महत्त्व समाजमनावर बिंबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन श्रीमती बासुतकर यांनी केले. अशोक महल्ले यांनी सुत्रसंचालन केले. साक्षी केवटी, करुणा वानखडे यांनी परिश्रम घेतले.

000000

  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...