घरोघरी कुष्ठ व क्षयरोग शोध मोहिमेला आजपासून प्रारंभ कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या भव्य रॅलीला उत्फूर्त प्रतिसाद

 








घरोघरी कुष्ठ व क्षयरोग शोध मोहिमेला आजपासून प्रारंभ

कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या भव्य रॅलीला उत्फूर्त प्रतिसाद

 

अमरावती, दि.13 : कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करुन घरोघरी कुष्ठ व क्षयरोग शोध मोहिमेला आज प्रारंभ करण्यात आला.

कृष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत या कार्यक्रमांतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक घरी कुष्ठ व क्षयरोग रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. या दरम्यान आशा वर्कर्स व पुरुष स्वयंसेवक घरोघरी भेटी देऊन या आजाराबाबत माहिती देणार आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांची शारिरिक तपासणीही करणार आहेत. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. अ.के. डवले यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौदाळे, तपोवन संस्थेचे सचिव सहदेव गोळे, जेष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद कासट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर नेहरु मैदानपासून बाईक, कार, सायकल व पायदळ रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नुतन कन्या शाळेच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी बँड वाजवून रॅलीची सुरुवात केली. यात कुष्ठरोग जनजागृतीचे फल‍क, कुष्ठ रोगासंदर्भात संदेश तसेच घोषणा करण्यात आल्यात. अमरावती सायकलींग असोसिएशनमार्फत सायकल रॅली, आरोग्य सेवक, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत बाईक रॅली व अन्य सदस्यांमार्फत कार रॅली काढण्यात आली. आशा स्वयंसेविका, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी, महामना मालविय विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्युट तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पायदळ रॅलीत सहभाग घेतला.

रॅलीच्या समारोप प्रसंगी आशिष लुल्ला व चमुने झुंबा नृत्य सादर केले. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे आरोग्य सेवक यांनी पथनाट्य सादर केले. समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. ढोले, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. फिरोज खान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट, समाजकार्य महाविद्यालयाचे राजकुमार दासरवाड, रणरागिणी फाउंडेशच्या भारती मोहकार, सायकलिंग असोशिएशनचे डॉ. कुलकर्णी यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती