Wednesday, September 21, 2022

लम्पी आजारावर जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

 

लम्पी आजारावर जनावरांचे

लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे दिसत आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भातकुली तालुक्यांतर्गत सर्व पशुपालक तसेच नागरिकांनी अशा गुरांना वेगळ्या ठिकाणी ठेवावे. तसेच तेथे नियमित स्वच्छता ठेवावी. त्या परिसराची नियमित फवारणी करुन घ्यावी. गुरांचे वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी तसेच 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ज्या जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे दिसत आहेत अशा जनावरांवर वेळीच उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन भातकुली तहसिलदार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...