Friday, September 23, 2022

महाडीबीटी कार्यान्वित; विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत समाजकल्याण उपायुक्तांची महाविद्यालयांना सूचना

 महाडीबीटी कार्यान्वित; विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत

समाजकल्याण उपायुक्तांची महाविद्यालयांना सूचना

अमरावती, दि. 23 :  यंदा शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल दि. 21 सप्टेंबर पासून कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ भरून घ्यावेत, अशी सूचना प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी केली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे अनूसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीमार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी योजना राबवल्या जातात.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज तात्काळ सादर करावेत. तसेच पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी असे आवाहन उपायुक्त श्री. वारे तसेच सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...