लंपी आजारावरील लसीकरण चार दिवसांत पुर्ण करा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा

 



लंपी आजारावरील लसीकरण चार दिवसांत पुर्ण करा

- मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा

 

 

अमरावती, दि. 16 (जिमाका) : लंपी या पशुरोगाला प्रतिबंध करण्यासाठी गुरांचे लसीकरण चार दिवसांत पुर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी दिले.

 

            चांदुर बाजार पंचायत समितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. गट विकास अधिकारी एस.डी. श्रृंगारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज सोळंके यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

            ही लस पूर्णपणे विनामुल्य आहे. गुरांना लस देण्यासाठी पैसे आकारल्यावरुन एका कर्मचाऱ्याला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. असा गैरप्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. पंडा यांनी यावेळी दिला. चांदुर बाजार तालुक्यात 26 हजार 500 गोवंश जनावरांपैकी 3 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरीत लसीकरण पुढील चार दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश श्री. पंडा यांनी दिले.

 

            या आजाराला मुख्यत्वे गायवर्ग बळी पडतो. म्हैसवर्ग बाधित होतो. तथापि, म्हशींची प्रतिकारशक्ती अधिक असते. शेळ्या व मेंढ्यांमध्ये हा आजार आढळत नाही.  बाधित गावांच्या पाच किलोमीटर परीघातील सर्व जनावरांचे विनामूल्य लसीकरणक करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 65 हजार 500 लस पुरवठा झाला आहे. खाजगी पशुवैद्यकांचीही मदत घेण्यात आली असून प्रति मात्रा 3 रुपये प्रमाणे मानधन देण्यात येत आहे. सर्व ग्रामपंचायत, नगरपालीका, महापालिका यांना किटकनाशक फवारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे, असे डॉ. सोळंके यांनी सांगितले.

 

            पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरावर 0721-2662066 हा संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून जनावरांमध्ये आजार आढळल्यास तत्काळ संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे 1962 हा टोल फ्री क्रमांकही कार्यन्वित आहे.

 

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती