Friday, September 16, 2022

नेहरु युवा केंद्राचे युवा मंडळ विकास अभियान संपन्न

 






नेहरु युवा केंद्राचे युवा मंडळ विकास अभियान संपन्न

अमरावती, दि. 16 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत तालुक्यातील गावांगावात युवा मंडळ विकास अभियान राबवित आहे. जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, धामणगाव, धारणी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, इत्यादी तालुक्यातील गावागावात जावुन गावातील युवक, सरपंच तसेच ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य अधिकारी तसेच सरकारी यंत्रणा यांच्या माध्यमातुन युवक मंडळ करण्यात आले.

तसेच ज्या गावात युवक मंडळ नाहीत त्या ठिकाणी युवक मंडळ स्थापीत  करून  तसेच ज्या गावांत मंडळ असून जी मंडळे कार्यरत नव्हती त्या मंडळांना पुर्नजीवित करून गावस्तरावर विविध समाजयोगी उपक्रम राबविणार आहे. 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान आयोजित  या युवा मंडळ विकास मंडळ अभियान अंतर्गत गावागावात वृक्षारोपण तसेच करोना प्रतिबंधक मात्रा घेण्यास गावकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहे. 10 युवकाचा गट तयार करून तालुक्यातील वेगवेगळया गावात फिरून हे अभियान राबविण्यात येणार आले. या दरम्यान स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी भाग घेतला त्यांच्या विषयी व त्यांच्या कार्याविषयी गावकऱ्यासोबतच आजच्या पिढीला त्यांनी दिलेल्या योगदाना बद्दल माहिती व्हावी म्हणून त्यांच्या कार्या बद्दल  या अभियानाच्या माध्यमातुन माहिती देण्यात आली.

स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी बलिदान दिले. अशा हुमात्म्याच्या आठवणित त्यांच्या नावाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानातुन स्थापित झालेल्या ग्रामीण युवक मंडळांच्या माध्यमातुन कौशल्य विकास कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रम, युवा आदान प्रदान कार्यक्रम, युवा संसद  युवा उत्सव अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरी गावांतील युवक युवतींनी या युवा मंडळ विकास अभियानात उस्फुर्तरित्या सहभाग घ्यावा तसेच ज्या गावात युवक मंडळ नाही किंवा मंडळ कार्यरत नाही अश्या गावातील युवक युवतींना आपल्या गावाच्या विधायक कार्याकरिता व सामाजिक सेवेकरिता नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातुन युवक मंडळ तयार करावे. सविस्त माहितीसाठी नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. व  शासकीय  यंत्रणा गावकरी यांनी हे अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...