दर्यापुर विधानसभा मतदार संघातील मतदारांना सूचना निवडणूक कार्ड आधारकार्ड सोबत जोडण्यासाठी रविवारी विशेष शिबिर

 दर्यापुर विधानसभा मतदार संघातील मतदारांना सूचना

 

निवडणूक कार्ड आधारकार्ड सोबत जोडण्यासाठी रविवारी विशेष शिबिर

 

अमरावती, दि.07: भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीतील  नोदींशी जोडण्यात येत आहे. ही विशेष मोहीम  40-दर्यापुर विधानसभा मतदार संघात राबविण्यात येत आहे.  या मोहिमेतंर्गत 40 - दर्यापुर विधानसभा मतदार संघातील 337 मतदान केंद्रावर येत्या रविवारी दि.11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून  सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदान केंद्रावर उपस्थित राहतील.  मतदानकार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया यावेळी राबविण्यात येईल  ग्रामस्थांनी या वेळेत आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कडून आपले व आपल्या कुटुंबातील मतदारांचे आधार क्रमांक लिंक करुन घ्यावे. तसेच मतदान कार्ड आधारकार्डसोबत जोडण्यासाठी निवडणुक आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करावे. त्या नंतर व्होटर रजिस्टेशनला क्लिक करुन फार्म 6 बी ला क्लिक करावे. लेट्स स्टार्टला क्लिक करुन स्वत:चा मोबाईल नंबर टाकावा. त्यावर आलेला ओटीपी टाकल्यावर व्हेरीफायला क्लिक करावे. व्होटर आयडी असेल तर एस आय हॅव व्होटर आयडी हे निवडा. व्होटर आयडी नंबर टाकून महाराष्ट्र राज्य निवडा व नंतर प्रोसिडला क्लिक करा व आधार नंबर टाकून डन व कन्फर्मला क्लिक करावे. शेवटी आधार निवडणुक ओळखपत्राला लिंक झाल्याचा संदेश येईल. मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन 40- दर्यापुर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार डॉ.योगेश देशमुख यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती