जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरती प्रक्रियेला गती

 


जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरती प्रक्रियेला गती

अमरावती, दि.15 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीतील बिंदुनामावली मागासवर्ग कक्षातर्फे प्राधान्याने अद्ययावत करण्यात आली असून, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रयत्नांनी अनुकंपा भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे.

जिल्ह्यामध्ये एकुण दहा नगरपालिका व चार नगरपंचायती आहेत.  नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या आस्थापनेवरील अनुकंपा पात्र उमेदवारांचे नियुक्त्या या रिक्त पदे व बिंदुनामावली अद्ययावत नसल्याने रखडल्या होत्या. तथापि, जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन व बैठका घेऊन बिंदूनामावली अद्ययावत करुन घेतली. तसेच प्रतिक्षासुची प्रसिध्द करुन प्रक्रियेला वेग दिला.

नगरपालिका शाखेतील जिल्हास्तरीय अनुकंपा सामाईक प्रतीक्षायादीमधून गट-क व गट-ड उमेदवारांची जेष्ठतेनुसार नगरपरिषद व नगरपंचायत मधील रिक्त जागांवर शिफारस करण्याबाबत बैठकही नुकतीच झाली.

            जिल्हास्तरीय अनुकंपा सामाईक प्रतीक्षायादीमध्ये गट-क च्या एकूण 28 व  गट-ड साठी एकूण 8 उमेदवारांची प्रतीक्षासूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रतीक्षायादीमधून नियमाप्रमाणे गट-क व गट-ड संवर्गातील एकूण रिक्त जागेच्या 20 टक्क्यांप्रमाणे गट-क साठी एकूण 7 व गट-ड साठी एकूण 2 उमेदवारांची जेष्ठतेनुसार अनुक्रमे लिपिक टंकलेखक व शिपाई आणि व्हॉल्वमन या पदांसाठी रिक्त पद असणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती