Saturday, September 17, 2022

कौशल्य विकासाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करा - अरुंधती शर्मा














 

देशात प्रथमच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य दीक्षांत समारंभ

कौशल्य विकासाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करा

                    -अरुंधती शर्मा

कौशल्य दीक्षांत समारंभात 1 हजार 327 विद्यार्थ्यांना पदवविका प्रदान

 

अमरावती दि.-17- औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधून उद्योगाला कुशल मनुष्यबळ पुरविले जाते. या कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांच्या सन्मानार्थ व येत्या काळात तंत्र शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयटीआयमध्ये देशात प्रथमच दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विद्यार्थ्यांनी या कौशल्य विकासाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता अरुंधती  शर्मा यांनी केले आहे.

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एन. एस. एस. सभागृहात आज प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अस्पा बंड सन्स ॲटो प्रा. लि. रणज‍ित बंड, शिव प्लॅस्टिक इंडस्ट्रिजचे  संचालक हेमंत ठाकरे, ईसीई इंडिया लि.चे अमीत आरोकर, अमरावती व्यवसाय श‍िक्षण व प्रश‍िक्षण प्रादेशिक कार्यालयाचे  सहसंचालक प्रदीप घुले,  औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या  श्रीमती एम. डी. देशमुख , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) प्राचार्य व्ही.आर. पडोळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, सहसंचालक नरेंद्र येते, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या उपप्राचार्य आर. जी. चुलेट, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती एम. आर. गुढे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

 

आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समांरभ साजरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. असे सांगत श्रीमती शर्मा म्हणाल्या की, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधून उद्योगाला कुशल मनुष्यबळ पुरविले  जाते. हे कुशल कारागीर देशाच्या आर्थ‍िक वि‍कासात महत्वाची भूमीका  बजावित असतात. भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीचे औचित्य साधून कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यपूर्ण मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय  यांच्या पुढाकाराने कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा  सन्मान व्हावा या उद्देशाने दीक्षांत समारंभाचे आयोजन देशभर करण्यात आले. ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे.

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 26 शाखेच्या माध्यमातून दरवर्षी विद्याार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. स्टेनोग्राफी व्यवसायातील रितेश चांदणे हा विद्यार्थी अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच सेक्रेटरीअल प्रॅक्टीस या व्यवसायातील जय काकडे हा विद्याार्थी अखिल भारतीय स्तरावर   द्व‍ितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यावेळी या संस्थेमधून प्रथम, द्व‍ितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना सन्मानित करण्यात आले.

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यात   यवतमाळ औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वायरमन या व्यवसायातील प्रशिक्षणार्थी करण चव्हाण, इलेक्ट्रीशीयन व्यवसायातील लीना  वाघमारे यांचा समावेश आहे.  तर उर्वरीत गडचचिरोली जिल्हातील देसाईगंज व आदिवासीबहुल  क्षेत्रातील आयटीआय मधून डिझेल मेकॅनिक या व्यवसायातील प्रशिक्षणार्थी सुशील हेडाऊ व नागपूर आयटीआय मधील एरोनॉटीकल स्ट्रक्चर ॲड इक्व‍िपमेंट फिटर या व्यवसायातील श्रुती  नरसुलवार आदी गुणवंत  ठरले आहेत. 

 

000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...