बांधकाम कामगारांनी सुविधा केंद्रात नोंदणी करुन योजनांचा लाभ घ्यावा

 बांधकाम कामगारांनी सुविधा केंद्रात

नोंदणी करुन योजनांचा लाभ घ्यावा

            अमरावती, दि.15 (जिमाका): इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांसाठी सुविधा व ललित केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे ॲन्टी करप्शन ब्युरो ऑफिस जवळ सुरु करण्यात आले आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त प्र. रा. महाले यांनी केले आहे.

नोंदणी, नुतनीकरण व लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी www.mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व अनोंदित बांधकाम कामगारांनी मंडळात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करून त्वरित नोंदणी करून मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बांधकाम कामगारांनी नवीन नोंदणी करण्यासाठी कोणत्याही ऑनलाईन सेंटर, सीएससी सेंटरला भेट देऊन मंडळाच्या संकेतस्थळाचा वापर करावा.

अर्ज सादर करताना कोणतीही त्रयस्थ व्यक्ती तसेच मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नये. जुन्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनीही वरील संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नुतनीकरण करावे. त्याचप्रमाणे नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांसाठी विविध योजनांच्या लाभाचे अर्जही या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मंडळाने कोणत्याही व्यक्तीस, संस्थेस बांधकाम कामगारांचे अर्ज ऑनलाईन भरुन देण्याचे अधिकार दिलेले नाहीत. याची नोंद घेण्याचे बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती